Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 28:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना ही वस्त्रे चढवून त्यांना अभिषेक करावा. त्यांच्यावर संस्कार करावा, आणि त्यांना पवित्र करावे म्हणजे ते याजक ह्या नात्याने माझी सेवा करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्या पुत्रांना ही वस्रे घालून, त्यांना अभिषेक करावा व त्यांच्यावर संस्कार करावा आणि त्यांना पवित्र कर म्हणजे मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र यांच्या अंगावर ही वस्त्रे घातल्यावर, त्यांचा अभिषेक आणि समर्पण कर. त्यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 28:41
24 Iomraidhean Croise  

तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ह्यांना इस्राएल लोकांतून आपल्याजवळ आण.


त्यांनी तयार करायची वस्त्रे ही : ऊरपट, एफोद, झगा, चौकड्यांचा अंगरखा, मंदील व कमरबंद. तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी व त्याच्या मुलांसाठी ही पवित्र वस्त्रे तयार करावीत. एफोद


आणि हे सर्व अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या हातांवर ठेव आणि हे ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळ.


मी तुला आज्ञा केली आहे त्या सर्व गोष्टींप्रमाणे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचे कर; सात दिवसांपर्यंत त्यांच्यावर संस्कार कर.


नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक कर.


आणि अहरोनाला व त्याच्या मुलांना कमरबंद बांध. त्यांच्या डोक्यांना फेटे बांध; ह्या प्रकारे ह्या निरंतरच्या विधीने त्यांना याजकपद प्राप्त व्हावे. ह्या प्रकारे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यावर संस्कार करावा.


आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून निर्भेळ शुद्ध आणि पवित्र असे धूपद्रव्य तयार करावेस;


अहरोनाला पवित्र वस्त्रे घाल व त्याला अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे तो याजक ह्या नात्याने माझी सेवा करील.


त्यांच्या बापाला जसा अभिषेक करशील तसाच त्यांना कर, म्हणजे याजक ह्या नात्याने ते माझी सेवा करतील. हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.”


त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल” आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल.


प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे; कारण दीनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे; भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंधमोचन विदित करावे;


ह्याप्रमाणे सात दिवस वेदीबद्दल प्रायश्‍चित्त करून तिची शुद्धी करावी; असा तिचा संस्कार व्हावा.


तुम्ही दर्शनमंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये; गेलात तर मराल; कारण परमेश्वराने विहित केलेल्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” त्यांनी मोशेच्या सांगण्याप्रमाणे केले.


मग त्याने एखाद्या पवित्र स्थळी पाण्याने स्नान करावे व आपली वस्त्रे घालून बाहेर जाऊन स्वतःसाठी व लोकांसाठी होमार्पण करून स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्‍चित्त करावे.


मग तो कोरह व त्याचे साथीदार ह्यांना म्हणाला, “परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवील व त्यांना आपल्याजवळ येऊ देईल; ज्याला तो निवडील त्याला तो आपल्याजवळ येऊ देईल.


अहरोनाचे मुलगे अभिषिक्त याजक असून याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी त्याने त्यांच्यावर संस्कार केला होता; त्यांचीच ही नावे आहेत.


कारण ज्याला देवाने पाठवले तो देवाची वचने बोलतो; कारण देव तो आत्मा मोजूनमापून देत नाही.


हा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो.


नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते; पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन ‘युगानुयुग’ परिपूर्ण केलेल्या ‘पुत्राला’ नेमते.


जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे.


तुमच्याविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुमच्यामध्ये राहतो, तेव्हा तुम्हांला कोणी शिकवण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक — तो सत्य आहे, खोटा नाही — तुम्हांला सर्व गोष्टींविषयी शिकवतो त्याप्रमाणे व त्याने तुम्हांला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan