Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 28:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ह्यांना इस्राएल लोकांतून आपल्याजवळ आण.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर मोशेला म्हणाला, याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांना इस्राएल लोकांतून वेगळे होऊन तुजकडे येण्यास सांग.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र, नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्यांना इस्राएली लोकांमधून तुझ्याकडे आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 28:1
33 Iomraidhean Croise  

अम्रामाचे पुत्र अहरोन व मोशे; अहरोनास वेगळे करण्यात आले ते अशासाठी की त्याने व त्याच्या वंशजांनी परमपवित्र वस्तू निरंतर पवित्र राखाव्यात; परमेश्वरासमोर निरंतर धूप जाळावा, त्याची सेवाचाकरी करावी व त्याच्या नामाने आशीर्वाद द्यावा.


योहानानास अजर्‍या झाला; शलमोनाने यरुशलेमेत जे मंदिर बांधले होते त्यात हा याजकाचे काम करीत असे.


बिन एलकाना, बिन यरोहाम, बिन अलीएल, बिन तोहा,


ह्या प्रकारे सर्व इस्राएलात लेवी आपली शिवारे व वतने सोडून यहूदा व यरुशलेम येथे आले; कारण त्यांनी परमेश्वराप्रीत्यर्थ याजकाचे काम करू नये म्हणून यराबाम व त्याचे पुत्र ह्यांनी त्यांना घालवून दिले होते.


हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर भाव ठेव; तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे.


त्याच्या याजकांपैकी मोशे व अहरोन, आणि त्याच्या नावाचा धावा करणार्‍यांपैकी शमुवेल, ह्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले.


मग तो मोशेला म्हणाला, “तू, अहरोन नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलांपैकी सत्तर जण असे मिळून परमेश्वराकडे वर चढून येऊन त्याला दुरून नमन करा.


मग मोशे, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलांपैकी सत्तर जण वर चढून गेले.


तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना ही वस्त्रे चढवून त्यांना अभिषेक करावा. त्यांच्यावर संस्कार करावा, आणि त्यांना पवित्र करावे म्हणजे ते याजक ह्या नात्याने माझी सेवा करतील.


त्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी जे तुला करायचे ते हे : एक गोर्‍हा आणि दोन दोषहीन मेंढे घ्यावेत,


दर्शनमंडप व वेदी मी पवित्र करीन; आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांनाही मी पवित्र करीन.


आणि अहरोनाला व त्याच्या मुलांना कमरबंद बांध. त्यांच्या डोक्यांना फेटे बांध; ह्या प्रकारे ह्या निरंतरच्या विधीने त्यांना याजकपद प्राप्त व्हावे. ह्या प्रकारे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यावर संस्कार करावा.


आणि याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना अभिषेक करून पवित्र कर.


कुशलतेने विणलेली तलम वस्त्रे म्हणजे याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे, त्याच्या मुलांची वस्त्रे,


पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि त्याच्या मुलांची वस्त्रे.


अहरोनाने अम्मीनादाबाची मुलगी नहशोनाची बहीण अलीशेबा बायको केली; तिच्यापासून त्याला नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे झाले.


अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यांत अग्नी घातला व त्यांवर धूप घालून तो अनधिकृत अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती.


मग मोशेने अहरोनाला व त्याचे राहिलेले मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की, “परमेश्वराच्या हव्यांपैकी उरलेले अन्नार्पण घेऊन वेदीजवळ खमिरावाचून खा, कारण ते परमपवित्र आहे;


याजक ह्या नात्याने परमेश्वराची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे सादर करण्यात आले त्या दिवशी, परमेश्वराच्या हव्यांपैकी हा त्याचा व त्याच्या मुलांचा अभिषेकाचा वाटा ठरला आहे;


परमेश्वर मोशेला म्हणाला,


“तू अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे ह्यांना आणि त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोर्‍हा, दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली ही घेऊन


पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपले याजकपण सांभाळावे; तुम्ही सेवा करावी, कारण मी तुम्हांला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे; कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे.”


त्याच्या दलाची जी मोजदाद झाली ती चौर्‍याहत्तर हजार सहाशे होती.


नादाब व अबीहू ह्यांनी परमेश्वरासमोर अनधिकृत अग्नी नेला तेव्हा ते ठार झाले.


एकदा असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करत असता,


इस्राएल लोक बएरोथ बनेयाकान1 येथून कूच करून मोसेरास आले. तेथे अहरोन मृत्यू पावला व त्याला मूठमाती देण्यात आली, आणि त्याचा मुलगा एलाजार त्याच्या जागी याजकाचे काम करू लागला.


कारण त्याने व त्याच्या वंशजांनी निरंतर परमेश्वराच्या नावाने सेवा करण्यास हजर राहावे म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुझ्या सर्व वंशांतून निवडून घेतले आहे.


तसेच त्याने माझा याजक व्हावे, माझ्या वेदीवर यज्ञ करावेत, धूप जाळावा आणि माझ्यासमोर एफोद ल्यावे म्हणून इस्राएलाच्या सर्व वंशांतून त्याला मी निवडून नेमले होते की नाही? आणखी तुझ्या मूळ पुरुषाच्या घराण्यास इस्राएल लोकांची सर्व हव्ये मी दिली की नाही?


Lean sinn:

Sanasan


Sanasan