Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 27:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 निवासमंडपाला अंगण कर; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाचे विणलेले पडदे जोडून त्यांची एक कनात कर; तिची लांबी एका बाजूला शंभर हात असावी;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 निवासमंडपाला अंगण तयार कर; त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची कनात कर, तिची लांबी एका बाजूला शंभर हात असावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “निवासमंडपासाठी अंगण बनवावे. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात लांब असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे असावेत,

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 27:9
29 Iomraidhean Croise  

त्याने आतले अंगण बांधले होते त्याला चिर्‍यांच्या तीन रांगा व गंधसरूच्या तुळयांची एक रांग लावली होती.


त्या दिवशी राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढल्या अंगणामध्ये एक स्थान पवित्र करून होमबली, अन्नबली आणि शांत्यर्पणाची चरबी ही तेथेच अर्पण केली, कारण परमेश्वरासमोर असलेल्या पितळेच्या वेदीवर त्यांचा समावेश होईना.


परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत त्याने नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधल्या.


आणखी त्याने याजकांचे अंगण व एक मोठे अंगण केले आणि अंगणाला दरवाजे करून त्यांची कवाडे पितळेने मढवली.


त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा; त्याचे उपकारस्मरण करा; त्याच्या नावाचा धन्यवाद करा.


परमेश्वराच्या घराच्या अंगणात, हे यरुशलेमा, तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेशाचे स्तवन करा!1


खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे2 मला इष्ट वाटते.


जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील.


तिच्यासाठी वीस खांब करावेत आणि त्या खांबांसाठी पितळेच्या वीस उथळ्या कराव्यात; खांबांच्या आकड्या आणि त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या कराव्यात.


अंगणाचे पडदे, त्याचे खांब, उथळ्या व अंगणाच्या फाटकासाठी पडदा;


अशा प्रकारे जोडून केलेल्या एका कनातीच्या बाहेरील शेवटल्या पडद्याच्या किनारीवर त्यांनी पन्नास बिरडी केली, तशीच दुसर्‍या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवरही त्यांनी पन्नास बिरडी केली.


अंगणाचे पडदे (अंगणाच्या कनाती), खांब व उथळ्या, अंगणाच्या फाटकाचा पडदा, तणावे, मेखा आणि निवासमंडपाच्या व दर्शनमंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य;


त्याने निवासमंडपासभोवती आणि वेदीच्या आसपास अंगणाची कनात उभी केली आणि अंगणाच्या फाटकास पडदा लावला.


सभोवती अंगण कर व त्याच्या फाटकास पडदा लाव.


त्याने देवडीचे माप घेतले; ते वीस हात भरले;1 त्या देवडीला2 लागून द्वाराभोवती अंगण होते.


तेव्हा त्याने मला बाहेरील अंगणात नेले तेव्हा तेथे सभोवार खोल्या असून त्या अंगणात चिरेबंदी केली होती असे दृष्टीस पडले; ह्या चिरेबंदीवर तीस खोल्या होत्या.


मग त्याने बाहेरल्या अंगणाला लागून उत्तराभिमुख असलेल्या द्वाराची लांबीरुंदी मोजली.


आतल्या अंगणात पूर्वेकडच्या द्वारासारखे उत्तरेकडच्या द्वारासमोर एक द्वार होते; एका द्वारापासून दुसर्‍या द्वारापर्यंत त्याने शंभर हात मापले.


तेव्हा त्याने मला दक्षिणद्वाराने आतल्या अंगणात नेऊन दक्षिणद्वार मापले, ते तितकेच भरले;


मग त्याने मला पूर्वेकडल्या आतील अंगणात नेऊन ते द्वार मापले, ते तेवढेच भरले.


आतील द्वाराच्या बाहेर, आतील अंगणात दोन खोल्या होत्या, एक उत्तरद्वाराच्या बाजूस दक्षिणाभिमुख होती व दुसरी दक्षिणद्वाराच्या बाजूस उत्तराभिमुख होती.


आतील वीस हाताच्या अंगणासमोर व बाहेरील अंगणाच्या फरसबंदीसमोर तिसर्‍या मजल्याला समोरासमोर सज्जे होते.


निवासमंडप आणि वेदी ह्यांच्या सभोवती असलेल्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा आणि त्यातील सर्व सामानासाठी लागणारे तणावे.


निवासमंडप आणि वेदी ह्यांच्यासभोवती असलेल्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या फाटकाचे पडदे व तणावे आणि त्यांच्या सेवेला लागणारी उपकरणे, हे सर्व सामान त्यांनी वाहावे; आणि ह्या सामानासंबंधाने जे काही काम पडेल ते सर्व त्यांनी करावे.


आणि सभोवती असलेल्या अंगणाचे खांब, त्यांच्या उथळ्या, मेखा, तणावे आणि त्याच्या सेवेला लागणारी इतर सर्व उपकरणे त्यांनी वाहून न्यावी व त्यांची निगा राखावी; हे जे सगळे सामान त्यांना वाहून न्यायचे त्यातील हरएक वस्तू तपशीलवार त्यांच्या स्वाधीन करावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan