Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 27:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तिच्यातील राख उचलून नेण्यासाठी हंड्या, त्याप्रमाणेच तिच्यासाठी फावडी, कटोरे, काटे आणि अग्निपात्रे बनवावीत, तिची सर्व उपकरणे पितळेची असावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 वेदीवरील सर्व पात्रे, म्हणजेच राख उचलून नेण्याची भांडे, फावडे, शिंपडण्याचे भांडे, मांसाचे काटे आणि अग्निपात्रे कास्याचे असावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 27:3
17 Iomraidhean Croise  

तसेच हीरामाने गंगाळे, फावडी व कटोरी ही बनवली. ह्या प्रकारे हीरामाने शलमोन राजासाठी परमेश्वराच्या मंदिराचे जे काम करायचे होते ते संपवले ते असे :


तशीच पात्रे, फावडी व कटोरे ही बनवली होती; परमेश्वराच्या मंदिरातील ही जी पात्रे हीरामाने शलमोन राजासाठी बनवली होती ती सर्व उजळ पितळेची होती.


पेले, कातरी, कटोरे, चमचे व धुपाटणी ही शुद्ध सोन्याची करवली होती; तसेच मंदिराचा अंतर्भाग म्हणजे परमपवित्रस्थान ह्याच्या दारांची व मंदिराच्या म्हणजे पवित्रस्थानाच्या दारांची बिजागरे सोन्याची करवली होती.


पात्रे, फावडी, चिमटे, धूपदाने आणि सेवेची सर्व पितळेची उपकरणे त्यांनी नेली.


अग्निपात्रे, कटोरे वगैरे जेवढी सोन्याची होती त्यांचे सोने व जी चांदीची होती त्यांची चांदी गारद्यांच्या सरदाराने नेली.


शुद्ध सोन्याचे काटे, कटोरे व प्याले व सोन्याच्या प्रत्येक सुरईसाठी सोने, त्याप्रमाणेच चांदीच्या प्रत्येक सुरईसाठी चांदी तोलून दिली.


हूरामाने हंडे, फावडी व कटोरे केले. ह्या प्रकारे हूरामाने शलमोन राजासाठी देवमंदिराचे जे काम करायचे होते ते संपवले.


हंडे, फावडी, काटे, इत्यादी सर्व सामान हूरामाने शलमोन राजासाठी परमेश्वराच्या मंदिराकरिता उजळ पितळेचे केले.


मोशेने अर्धे रक्त घेऊन कटोर्‍यात ठेवले आणि अर्धे वेदीवर शिंपडले.


निवासमंडपातील सगळे साहित्य, त्याच्या सर्व मेखा आणि अंगणाच्या सर्व मेखा पितळेच्या असाव्यात.


तिच्या चार्‍ही कोपर्‍यांना चार शिंगे बनवावीत. ही शिंगे अंगचीच असावीत; ही वेदी पितळेने मढवावी.


तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी; चाळणीच्या चार्‍ही कोपर्‍यांसाठी पितळेच्या चार कड्या बनवाव्यात.


आणि त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनवली.


आणि परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखार्‍यांनी भरलेले धूपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा;


आणि वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्निपात्रे, काटे, फावडी, कटोरे आदिकरून वेदीचे सर्व सामान तिच्यावर ठेवावे, त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि तिचे दांडे बसवावेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan