Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 27:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 साक्षपटासमोर असणार्‍या अंतरपटाबाहेर दर्शनमंडपात1 अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर उजळण्याची व्यवस्था ठेवावी; हा इस्राएल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शनमंडपामध्ये अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची व्यवस्था करावी; हा इस्राएल लोकांसाठी व त्यांच्या वंशासाठी पिढ्यानपिढ्या कायमचा विधी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात त्याच्याबाहेर, अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी याहवेहसमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिवे पेटत ठेवावे. इस्राएलात हा विधी पिढ्यान् पिढ्या असावा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 27:21
44 Iomraidhean Croise  

देवाने प्रकाशाला ‘दिवस’ व अंधकाराला ‘रात्र’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस.


देवाने अंतराळाला ‘आकाश’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा दुसरा दिवस.


ते नित्य सकाळी व संध्याकाळी परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली व सुगंधी धूप जाळतात; ते शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात; सोन्याचा दीपवृक्ष व त्यावरचे दिवे दररोज संध्याकाळी ते उजळतात; आम्ही आपला देव परमेश्वर ह्याची आज्ञा पाळत असतो, पण तुम्ही त्याला सोडले आहे.


परमेश्वराच्या घरात प्रतिरात्री उभे राहणारे, परमेश्वराचे सर्व सेवकहो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा;


हा दिवस तुम्हांला स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा; पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा.


परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते जतन करावे म्हणून साक्षपटासमोर अहरोनाने ठेवले.


आणि जो साक्षपट मी तुला देईन तोही त्या कोशात ठेवावा.


आणि अहरोन अथवा त्याचे मुलगे दर्शनमंडपात2 प्रवेश करतील व पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातील, तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावेत. नाहीतर त्यांना दोष लागून ते मरतील; अहरोनाला व त्याच्या पश्‍चात त्याच्या वंशाला हा नियम निरंतरचा आहे.


इस्राएल लोकांकडून मिळणारा अहरोनाचा व त्याच्या मुलांचा हा निरंतरचा हक्क आहे, कारण हे समर्पित केलेले दान आहे; हे इस्राएलांकडून त्यांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित केलेले दान होय.


दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण नित्य अर्पावे. ह्या स्थळी तुझ्याशी बोलण्यासाठी मी तुम्हांला भेटेन.


दर्शनमंडप व वेदी मी पवित्र करीन; आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांनाही मी पवित्र करीन.


अहरोन व त्याचे वंशज ह्यांच्यासाठी हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी व्हावा.”


त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे आणि ते थोडेसे घेऊन दर्शनमंडपातील ज्या कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन त्यात ठेवावे; ते तुम्ही परमपवित्र लेखावे.


तसाच संध्याकाळी तो दिवे लावील तेव्हा त्याने धूप जाळावा; हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळत जावा.


त्यामध्ये साक्षपटाचा कोश ठेव आणि तो अंतरपटाने झाक.


“जेव्हा जेव्हा तुम्ही, म्हणजे तू व तुझे मुलगे दर्शनमंडपात जाणार असाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस अथवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल; हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय;


इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापांबद्दल वर्षातून एकदा प्रायश्‍चित्त करण्यात यावे, म्हणून हा तुम्हांला निरंतरचा विधी होय.”परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने केले.


आणि ह्यामुळे व्यभिचारी मतीने अजदैवतांच्या (बोकड) मागे लागून त्यांना त्यांनी आपले यज्ञपशू अर्पण करू नयेत; हा तुम्हांला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर किंवा हुरडा किंवा हिरवे धान्य खाऊ नये; तुमच्या सर्व घरा़घरांतून हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


तुम्ही त्याच दिवशी हे जाहीर करावे की, आज आपला एक पवित्र मेळा भरणार आहे म्हणून कोणीही अंगमेहनतीचे काम करू नये; तुमच्या सर्व निवासस्थानांतून तुम्हांला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून उजेड मिळावा म्हणून जैतुनाचे हातकुटीचे निरे तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे.


अहरोनाने दर्शनमंडपात साक्षीच्या कोशाजवळ असलेल्या अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर नित्य संध्याकाळ-पासून सकाळपर्यंत त्याची व्यवस्था ठेवावी; हा तुमचा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


ही भाकर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र स्थळी खावी; कारण निरंतरच्या विधीप्रमाणे परमेश्वराला अर्पण केलेल्या हव्यांपैकी ती त्याला परमपवित्र होय.”


तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये, हा तुम्हांला तुमच्या सर्व निवासस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या निरंतरचा निर्बंध होय.”


त्याने त्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा, आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.


त्या अन्नार्पणातून मूठभर सपीठ, थोडे तेल व त्यावरील सगळा धूप घेऊन अन्नार्पणाचा स्मारकभाग म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास व्हावा म्हणून त्यांचा वेदीवर होम करावा.


ज्या दिवशी परमेश्वराने त्यांना अभिषेक केला त्या दिवशी त्याने त्यांना इस्राएल लोकांकडून हा वाटा मिळावा अशी आज्ञा केली, म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांचा हा निरंतरचा हक्क ठरला आहे.”


कारण याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे; कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे;


तर लेव्यांनीच दर्शनमंडपाची सेवा करावी; त्यांना लोकांच्या अन्यायाचा दोष वाहावा लागेल. हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. लेव्यांना इस्राएल लोकांमध्ये काही वतन नसावे,


पवित्रस्थानाचे व वेदीसंबंधीचे कर्तव्य तुम्हीच करावे म्हणजे इस्राएल लोकांवर पुन्हा कोप होणार नाही.


त्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय; अशौच-क्षालनाचे पाणी जो शिंपडील त्याने आपले कपडे धुवावेत आणि जो त्या अशौचक्षालनाच्या पाण्याला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.


तुमच्या पिढ्यानपिढ्यासाठी तुमच्या सर्व वस्तीच्या ठिकाणी ह्या गोष्टी तुमच्या न्यायाचे विधी म्हणून नेमलेल्या आहेत.


मग तू लेव्यांना दर्शनमंडपासमोर सादर करावे आणि इस्राएल लोकांची सर्व मंडळी तेथे जमवावी;


अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.”


तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या;


तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता, आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करण्यास राजी झालात.


कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.


शिवाय अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे1 वचन आमच्याजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.


इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही : जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो, जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो,


देवाचा दीप अजून मालवला नव्हता, आणि शमुवेल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे निजला होता.


त्या दिवसापासून पुढे हीच वहिवाट पडली; त्याने असाच नियमविधी इस्राएलांस आजपर्यंत लावून दिला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan