Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 26:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 तंबूच्या दारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा वेलबुट्टीदार पडदा बनवावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 “पवित्र निवासमंडपाच्या दारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा पडदा करून त्यावर वेलबुट्टीदार पडदा बनवावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 “निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या रेशमी तागाचा नक्षीदार पडदा बनवावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 26:36
19 Iomraidhean Croise  

मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले त्या दिवसापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही; डेर्‍यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे.


त्याने शिलो येथील निवासमंडप म्हणजे मानवामध्ये उभारलेला आपला डेरा सोडून दिला;


तसेच निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनवावा व त्यावर कुशल कारागिराकडून करूब काढवावेत;


अंगणाच्या फाटकासाठी एक पडदा बनवावा. तो निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा असून वेलबुट्टीदार असावा. तो वीस हात असून त्याला चार खांब व चार उथळ्या असाव्यात.


न्यायाचा ऊरपटही कुशल कारागिराकडून तयार करावा, तो एफोदाप्रमाणे करावा; तो सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा, कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा.


चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा, तसेच एक मंदिलही तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा.


निवासमंडप, त्याचा तंबू व त्यावरील आच्छादन, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व उथळ्या;


धूपवेदी, तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, व निवासमंडपाच्या दारासाठी पडदा;


त्यांनी तंबूच्या दारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा वेलबुट्टीदार पडदा बनवला;


अंगणाच्या फाटकाचा पडदा वेलबुट्टीदार असून, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता; त्याची लांबी वीस हात व रुंदीकडील उंची अंगणाच्या पडद्याइतकी पाच हात होती.


कातलेल्या तलम सणाचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरबंद हे बनवले; परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.


त्यांनी मग तो निवासमंडप मोशेकडे आणला; तंबू व त्याचे सर्व सामान म्हणजे त्याच्या आकड्या, त्याच्या फळ्या, त्याचे अडसर, त्याचे खांब व त्याच्या उथळ्या;


साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवासमंडपाच्या दाराचा पडदा लाव.


तुला वेलबुट्टीची वस्त्रे लेववली, उत्तम चर्मी जोडा तुझ्या पायात घातला, तुझ्या मस्तकाला उत्तम तागाचे वस्त्र गुंडाळले व तुला रेशमी ओढणी पांघरवली.


दर्शनमंडपातील ज्या वस्तू गेर्षोनी पुरुषांच्या स्वाधीन करायच्या त्या ह्या : निवासमंडप, तंबू, त्यावरील आच्छादन व दर्शनमंडपाच्या दाराचा पडदा,


ज्या दिवशी निवासमंडप म्हणजे साक्षपटाचा तंबू उभा करण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याच्यावर छाया केली; संध्याकाळी तो निवासमंडपावर अग्नीसारखा दिसला आणि सकाळपर्यंत राहिला.


मी दार आहे. माझ्या द्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणप्राप्ती होईल; तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल.


येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan