Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 26:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तसेच निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनवावा व त्यावर कुशल कारागिराकडून करूब काढवावेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 तलम सणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा एक अंतरपट बनवावा आणि त्यावर कुशल कारागिराकडून करुब काढून घ्यावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 “निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या कातलेल्या रेशमी तागाचा पडदा करून त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 26:31
30 Iomraidhean Croise  

मग त्याने निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सणाच्या कापडाचा अंतरपट केला व त्यावर करूब काढले.


हे यरुशलेमे, जर मी तुला विसरलो तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.


आणि सोन्याचे दोन करूब2 दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी कर; ते घडीव कामाचे असावेत.


निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकर्‍यांचे केस;


निवासमंडप दहा पडद्यांचा कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सुताचे तयार करावेत व त्यांवर कुशल कारागिरांकडून करूब काढवावेत.


हा पट सोन्याने मढवलेल्या बाभळीच्या लाकडाच्या चार खांबांवर लटकवावा, त्याच्या आकड्या सोन्याच्या असाव्यात व ते खांब चांदीच्या चार उथळ्यांत उभे करावेत.


अंगणाच्या फाटकासाठी एक पडदा बनवावा. तो निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा असून वेलबुट्टीदार असावा. तो वीस हात असून त्याला चार खांब व चार उथळ्या असाव्यात.


साक्षपटासमोर असणार्‍या अंतरपटाबाहेर दर्शनमंडपात1 अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर उजळण्याची व्यवस्था ठेवावी; हा इस्राएल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


न्यायाचा ऊरपटही कुशल कारागिराकडून तयार करावा, तो एफोदाप्रमाणे करावा; तो सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा, कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा.


कोश व त्याचे दांडे, दयासन व अंतरपट;


ज्या स्त्रिया सुबुद्ध ह्रदयाच्या होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत कातले आणि ते कातलेले सूत व आपल्या हातांनी विणलेले तलम सणाचे कापड त्यांनी आणले;


कोरीव काम करणारे कुशल कारागीर, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या व सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व तर्‍हेचे कसबी काम करणारे, कुशल कामाची योजना करणारे अशासारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे.


निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकर्‍यांचे केस;


मग त्यांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनवला व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब काढवले;


आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले. ते सोन्याने मढवले; त्यांच्या आकड्या सोन्याच्या केल्या आणि त्यांच्यासाठी चार चांदीच्या उथळ्या ओतल्या.


त्यांच्यामध्ये जे बुद्धिमान पुरुष काम करीत होते त्या सर्वांनी दहा पडद्यांचा निवासमंडप बनवला; हे पडदे त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे तयार केले व त्यांवर कुशल कारागिराकडून करूब काढवले.


त्याच्या जोडीला दान वंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब हा कोरीव काम करणारा कुशल कारागीर असून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारा होता.


त्याने तो कोश निवासमंडपात नेला आणि अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.


त्यामध्ये साक्षपटाचा कोश ठेव आणि तो अंतरपटाने झाक.


हे राजकन्ये, तुझे पादत्राणयुक्त पाय किती सुंदर आहेत! कुशल कारागिराच्या हातांनी घडवलेल्या रत्नहारांसारख्या तुझ्या जांघा गोल आहेत.


मग त्याने लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बकर्‍याचा वध करावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि जसे त्याने गोर्‍ह्याच्या रक्ताचे केले तसेच बकर्‍याच्या रक्ताचे करावे, म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की, तू भलत्या वेळी पवित्रस्थानात अंतरपटाच्या आत कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नयेस, गेलास तर मरशील, कारण दयासनावरील मेघात मी दर्शन देत जाईन.


छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आत जाऊन अंतरपट खाली काढावा व त्याने साक्षपटाचा कोश झाकावा;


तेव्हा पाहा, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले;


तेव्हा पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला.


आणि पवित्रस्थानातील पडदा मधोमध फाटला.


कारण तोच आमची शांती आहे; त्याने दोघांना एक केले आणि मधली आडभिंत पाडली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan