Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 25:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “मग मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी, म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान बनवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 25:8
25 Iomraidhean Croise  

मी इस्राएलामध्ये वस्ती करीन, आणि माझ्या इस्राएल प्रजेस मी टाकणार नाही.”


तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला जिवेभावे शरण जा. उठा, परमेश्वर देवाचे पवित्रस्थान बांधायला लागा; परमेश्वराच्या नामाप्रीत्यर्थ जे मंदिर बांधायचे आहे त्यात परमेश्वराच्या कराराचा कोश व देवाची पवित्र पात्रे ठेवायची आहेत.”


तू त्यांना आपल्या वतनाच्या डोंगरावर आणून लावशील; हेच, हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान आहे; हेच, हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले पवित्रस्थान आहे.


परमेश (याह) माझे बल, माझा स्तोत्रविषय आहे, तो माझा उद्धारक झाला आहे; हाच माझा देव, स्तवनाने मी ह्याला सुशोभित करीन; हाच माझ्या पित्याचा देव मी ह्याचा महिमा गाईन.


आणि मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन.


त्यांच्यामध्ये राहण्यासाठी ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर काढले तो मी परमेश्वर त्यांचा देव आहे असे त्यांना कळेल; मी त्यांचा देव परमेश्वर आहे.


अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठायी थोर आहे.”


आणखी मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन, तो करार सर्वकाळचा होईल; मी त्यांना वसवीन, त्यांची संख्या वाढवीन, आणि सर्वकाळ राहील असे माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये स्थापीन.


माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये सर्वकाळ राहील, तेव्हा राष्ट्रांना समजेल की इस्राएलास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”


तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, हे माझ्या सिंहासनाचे स्थळ, माझ्या पदासनाचे स्थळ आहे; तेथे मी इस्राएल वंशजांमध्ये सर्वकाळ राहीन; इस्राएल घराण्याचे लोक व त्यांचे राजे आपल्या व्यभिचाराने व त्यांच्या राजांनी स्थापलेल्या प्रेतवत मूर्तींनी आपल्या उच्च स्थानांवर ह्यापुढे माझ्या2 पवित्र नामाला बट्टा लावणार नाहीत;


मग अहरोनाचा चुलता उज्जीयेल ह्याचे मुलगे मीशाएल व एलसाफान ह्यांना मोशेने बोलावून सांगितले की, “तुम्ही इकडे येऊन तुमच्या बांधवांना पवित्रस्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”


त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये; आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करू नये, कारण त्याच्या देवाच्या तैलाभिषेकाने त्याच्यावर संस्कार झाला आहे; मी परमेश्वर आहे.


मी तुमच्यामध्ये माझी वस्ती करीन आणि माझा जीव तुमचा तिरस्कार करणार नाही.


याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे आणि परमेश्वरासमोर, पवित्रस्थानाच्या अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.


हे सीयोनकन्ये जयजयकार व उल्लास कर; कारण पाहा, मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर असे म्हणतो, मी सीयोनेस परत आलो आहे, मी यरुशलेमेत वस्ती करणार; यरुशलेमेस ‘सत्यनगर’ म्हणतील व सेनाधीश परमेश्वराच्या पर्वतास ‘पवित्र गिरी’ म्हणतील.


मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांना छावणीबाहेर पाठवून द्यावे; त्यांच्यामुळे तुमची छावणी अशुद्ध होता कामा नये, कारण तिच्यामध्ये माझा निवास आहे.”


तू ‘जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर,’ असे ‘ज्याने मोशेला सांगितले’ त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता.


देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत; देवाने असे म्हटले आहे की, “‘मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन. मी त्यांचा देव होईन, व ते माझे लोक होतील.’


तेव्हा जे स्थळ तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथेच मी तुम्हांला सांगतो त्या सगळ्या वस्तू आणा : आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करायची अर्पणे आणि तुम्ही परमेश्वराला कराल ते सर्व विशिष्ट नवस.


ख्रिस्त तर ‘देवाच्या घरावर’ नेमलेला पुत्र ह्या नात्याने विश्वासू होता, आणि आपण आपला भरवसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत.


तेव्हा एलाजार याजकाचा मुलगा फिनहास ह्याने रऊबेन, गाद व मनश्शे ह्यांच्या वंशजांना म्हटले, “आज आमची खात्री झाली आहे की, परमेश्वर आपल्यामध्ये आहे, कारण ह्या कामात तुम्ही परमेश्वराचा विश्वासघात केलेला नाही; तुम्ही आता इस्राएल लोकांना परमेश्वराच्या हातून वाचवले आहे.”


आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी : “‘पाहा,’ देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वतः ‘त्याच्याबरोबर राहील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan