Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 25:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आणि जो साक्षपट मी तुला देईन तोही त्या कोशात ठेवावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 देव म्हणाला, मी तुला साक्षपट देईन तोही त्या कोशात ठेवावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मग कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार, त्या तू कोशाच्या आत ठेवाव्यात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 25:16
22 Iomraidhean Croise  

इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबात मोशेने ह्या कोशात दोन दगडी पाट्या ठेवल्या होत्या; त्यांखेरीज त्यात दुसरे काही नव्हते.


मग त्याने राजकुमाराला बाहेर आणले, त्याच्या शिरावर मुकुट ठेवून त्याच्या हातात आज्ञापट दिला; मग त्यांनी त्याला अभिषेक करून राजा केले व टाळ्यांचा गजर करून म्हटले, “राजा चिरायू होवो.”


मग त्याने राजकुमारास बाहेर आणून त्याच्या शिरी मुकुट ठेवला आणि त्याला आज्ञापट देऊन राजा केले; यहोयादा व त्याचे पुत्र ह्यांनी त्याला अभिषेक केला; तेव्हा सर्व लोक म्हणाले, “राजा चिरायू होवो.”


परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते जतन करावे म्हणून साक्षपटासमोर अहरोनाने ठेवले.


दयासन कोशावर लावावे आणि जो साक्षपट मी तुला देईन तो त्या कोशात ठेवावा.


अंतरपट आकड्यांत लटकवून त्याच्याआड आतल्या बाजूला साक्षपटाचा कोश ठेवावा; तुमच्याकरता हा अंतरपट पवित्रस्थान व परमपवित्रस्थान ही अलग करील.


साक्षपटासमोर असणार्‍या अंतरपटाबाहेर दर्शनमंडपात1 अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर उजळण्याची व्यवस्था ठेवावी; हा इस्राएल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे आणि ते थोडेसे घेऊन दर्शनमंडपातील ज्या कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन त्यात ठेवावे; ते तुम्ही परमपवित्र लेखावे.


साक्षपटाच्या कोशाजवळ असलेल्या अंतरपटासमोर, अर्थात साक्षपटावरील ज्या दयासनी मी तुला भेट देत जाईन त्यासमोर ही वेदी ठेवावी.


परमेश्वराने मोशेबरोबर सीनाय पर्वतावर हे सर्व भाषण केल्यावर आपल्या बोटाने लिहिलेले पाषाणाचे दोन साक्षपट त्याला दिले.


मग मोशे मागे फिरून आपल्या हाती साक्षपटाच्या त्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला; त्या पाट्यांवर पुढच्या व मागच्या अशा दोन्ही बाजूंना लिहिले होते.


मग मोशे सीनाय पर्वतावरून उतरला; आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हातात घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहर्‍यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते.


निवासमंडपाचे म्हणजे साक्षपटाच्या निवासमंडपाचे जे सामान लेव्यांच्या सेवेकरता केले त्याची यादी मोशेच्या सांगण्यावरून अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याने केली तीच ही.


त्याने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले;


आणि दर्शनमंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हांला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव.


तू ‘जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर,’ असे ‘ज्याने मोशेला सांगितले’ त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता.


सर्व बाबतींत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांना सोपवून दिली होती.


“नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कराराच्या कोशाच्या आत एका बाजूला ठेवा म्हणजे तो तेथे तुमच्याविरुद्ध साक्षीदार म्हणून राहील,


त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढवलेला कराराचा कोश होता; ह्या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या होत्या;


“साक्षपटाचा कोश वाहणार्‍या याजकांना यार्देनेतून वर येण्याची आज्ञा कर.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan