Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 24:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली. अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी त्याने एक वेदी बांधली, आणि इस्राएलाच्या बारा वंशांप्रमाणे बारा स्तंभ उभारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तेव्हा मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली, मोशेने पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व इस्राएलाच्या बारा वंशाप्रमाणे बारा स्तंभ उभे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मग याहवेहने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व त्याने लिहून ठेवले. दुसर्‍या दिवशी अगदी सकाळी मोशेने उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व इस्राएलाच्या बारा गोत्रानुसार बारा खांब उभे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 24:4
27 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार.” परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली.


याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाला घेतला होता त्याचा त्याने स्मारकस्तंभ उभारून त्याला तेलाचा अभ्यंग केला.


हा जो धोंडा मी स्मारकस्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल; आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन.”


तेव्हा याकोबाने एक धोंडा घेऊन त्याचा स्तंभ उभारला.


अहीयाने आपल्या अंगावरचे नवे वस्त्र काढून त्याचे बारा तुकडे केले.


‘तुझे इस्राएल असे नाव पडेल’ असे याकोबाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते, त्याच्या वंशसंख्येइतके बारा धोंडे एलीयाने घेतले;


ह्या मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी त्यांनी शंभर बैल, दोनशे मेंढे, चारशे कोकरे आणि सर्व इस्राएलासाठी इस्राएल वंशांच्या संख्येप्रमाणे पापार्पणे म्हणून बारा बकरे अर्पण केले.


ज्यांनी आपली मोहर केली ते हेच : हखल्याचा पुत्र नहेम्या तिर्शाथा (प्रांताधिपती) व सिद्कीया,


आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की, “ह्याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशवाच्या कानी घाल; कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून5 अजिबात पुसून टाकीन.”


तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव ‘याव्हे-निस्सी’ (परमेश्वर माझा झेंडा) असे ठेवले;


आता जे नियम तू त्यांना लावून द्यावेत ते हेच :


मग त्याने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांना वाचून दाखवला; ते ऐकून ते म्हणाले, “जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू.”


इस्राएलाच्या मुलांच्या नावांच्या संख्येएवढी ही रत्ने असावीत, त्यांच्या संख्येइतकी बारा नावे असावीत, मुद्रा जशी कोरतात तसे बारा वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “ही वचने लिहून ठेव, कारण ह्याच वचनाप्रमाणे मी तुझ्याशी व इस्राएल लोकांशी करार केला आहे.”


त्या दिवशी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी वेदी होईल व त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी स्तंभ होईल.


तू सपीठ घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी.


“इस्राएल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी एक अशा बारा काठ्या घे आणि प्रत्येक काठीवर त्याचे-त्याचे नाव लिही;


ह्यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करावा.”


आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.


मग मोशेने हे नियमशास्त्र लिहून परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लेवीय याजक आणि इस्राएल लोकांचे सगळे वडील ह्यांच्या स्वाधीन केले.


यार्देनेतून उचलून आणलेले बारा धोंडे यहोशवाने गिलगाल येथे उभे केले.


यहोशवा त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे एकेक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या,


नगरीच्या तटाला बारा पाये होते, त्यांच्यावर कोकर्‍याच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan