Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 24:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि नियम लोकांना सांगितले, तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की, “जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सर्वांप्रमाणे आम्ही करू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मोशेने लोकांस परमेश्वराचे सर्व नियम व आज्ञा सांगितल्या; मग सर्व लोक एका आवाजात म्हणाले, “परमेश्वराने जी वचने सांगितलेली त्या सर्वांप्रमाणे आम्ही करू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मग मोशेने जाऊन याहवेहचे शब्द व नियम लोकांना सांगितले, त्यांनी एका आवाजात प्रतिसाद देत म्हटले, “याहवेहने जे सर्वकाही सांगितले त्याप्रमाणे आम्ही करू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 24:3
23 Iomraidhean Croise  

त्यांनी जयघोष करून आणि कर्णे व रणशिंगे वाजवून उच्च स्वराने परमेश्वरासमक्ष शपथ वाहिली.


सर्व यहूदी लोक आणभाक करून हर्षभरित झाले; त्यांनी मनःपूर्वक शपथ वाहिली, ते मोठ्या उत्कंठेने त्याला शरण गेले आणि तो त्यांना पावला; परमेश्वराने त्यांना चोहोकडून स्वास्थ्य दिले.


“ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे, त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा.”


तेव्हा सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले, “परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.” मोशेने लोकांचे हे शब्द परमेश्वराला कळवले.


एकट्या मोशेने मात्र परमेश्वरासमीप यावे; बाकीच्यांनी जवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर त्याच्याबरोबर चढून वर येऊही नये.”


मग त्याने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांना वाचून दाखवला; ते ऐकून ते म्हणाले, “जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू.”


ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडी भट्टीतून बाहेर काढले त्या दिवशी हा करार मी त्यांना आज्ञापिला व म्हटले, माझी वाणी ऐका व माझ्या आज्ञेप्रमाणे सगळी वचने पाळा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन;


“परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो तुमचे पूर्वज मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले तेव्हा मी त्यांच्याबरोबर करार केला की,


तुम्ही मिसर देशातून निघालात तेव्हा तुमच्याबरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठायी कायम आहे; तुम्ही भिऊ नका.


आम्हा सर्वांचा एकच पिता नाही काय? एकाच देवाने आम्हांला उत्पन्न केले नाही काय? असे असताना आम्ही आपापल्या बंधूचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो बरे?


म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावीस आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था, त्याचे विधी, त्याचे नियम व त्याच्या आज्ञा नित्य पाळाव्यात.


आता, अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम मी तुम्हांला शिकवत आहे ते पाळावेत म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.


इस्राएल लोक मिसर देशातून निघाले तेव्हा त्यांना मोशेने सांगितलेले निर्बंध, विधी व नियम हेच;


पाहा, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही जात आहात त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हांला विधी व नियम शिकवले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे.


मोशेने सर्व इस्राएल लोकांना बोलावून सांगितले : “अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम आज मी तुम्हांला ऐकवत आहे ते ऐका; तुम्ही ते शिका आणि काळजीपूर्वक पाळा.


पण तू येथे माझ्याजवळ उभा राहा आणि जी आज्ञा आणि जे विधी व नियम तू त्यांना शिकवावेत, ते सर्व मी तुला सांगेन, म्हणजे जो देश मी त्यांना वतन म्हणून देत आहे तेथे त्यांनी ते पाळावेत.’


तुमचा देव परमेश्वर ह्याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हांला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे ते हे : तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावेत.


लोक यहोशवाला म्हणाले, “नाही, आम्ही परमेश्वराचीच सेवा करणार.”


यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्ही सेवेसाठी परमेश्वराला निवडले आहे, ह्याविषयी तुमचे तुम्हीच साक्षी आहात.” ते म्हणाले, “आम्हीच साक्षी आहोत.”


लोक यहोशवाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan