Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 24:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 पण इस्राएल लोकांच्या सरदारांवर त्याने हात उगारला नाही; त्यांना देवाचे दर्शन झाले आणि त्यांनी खाणेपिणे केले. सीनाय पर्वतावर मोशे

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 इस्राएलातील वडिलधाऱ्या मनुष्यांनी देवाला पाहिले, परंतु त्याने त्यांचा नाश केला नाही. मग त्यांनी तेथे एकत्र खाणेपिणे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 परंतु त्या इस्राएलाच्या वडिलांविरुद्ध परमेश्वराने आपला हात उगारला नाही; त्यांनी परमेश्वराला पाहिले आणि त्यांनी खाणेपिणे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 24:11
24 Iomraidhean Croise  

तिच्याशी बोलणार्‍या परमेश्वराचे नाव तिने आत्ता-एल-रोई (तू पाहणारा देव) असे ठेवले; ती म्हणाली, “मला पाहणार्‍याला मी ह्याही ठिकाणी मागून पाहिले काय?”


कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार, आणि त्याच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार.


नंतर याकोबाने डोंगरावर यज्ञ केला. आणि आपल्या भाऊबंदांना भोजनास बोलावले; त्यांनी भोजन करून त्या डोंगरावर रात्र घालवली.


मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली व त्यांवर त्याची मुद्रा केली; आणि नाबोथ राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडील जन व सरदार ह्यांच्याकडे ती रवाना केली.


शतपती, अमीरउमराव, लोकांचे सुभे व देशाचे सर्व लोक ह्यांना त्याने बरोबर घेऊन परमेश्वराच्या मंदिरातून राजाला बाहेर आणले; ते वरच्या वेशीतून निघून राजमंदिरात आले आणि राजा राजासनावर बसला.


मी कोठे गेलो होतो व काय केले होते हे सरदारांना ठाऊक नव्हते; मी अद्यापि यहूदी, याजक, अमीर-उमराव, शास्ते व वरकड कामकरी ह्यांतल्या कोणालाही काहीएक सांगितले नव्हते.


तू मागूनपुढून मला वेढले आहेस, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस.


मग मोशेचा सासरा इथ्रो ह्याने देवाला होमबली अर्पण केले व यज्ञ केले; आणि अहरोन इस्राएलांच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो ह्याच्याबरोबर देवासमोर भोजन करायला आला.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “खाली जाऊन लोकांना ताकीद दे, नाहीतर ते मर्यादा ओलांडून काय आहे ते पाहायला परमेश्वराकडे येतील आणि त्यांच्यापैकी पुष्कळ मरतील.


मग तो मोशेला म्हणाला, “तू, अहरोन नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलांपैकी सत्तर जण असे मिळून परमेश्वराकडे वर चढून येऊन त्याला दुरून नमन करा.


जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे.


त्यांच्यातले श्रेष्ठ जन आपल्या कनिष्ठांना पाण्यासाठी पाठवतात; ते विहिरीवर जातात पण त्यांना पाणी मिळत नाही, ते रिकाम्या घागरी घेऊन येतात; ते लज्जित व फजीत होऊन आपली डोकी झाकून घेतात.


स्वामी महाराज, मी तर आपला सेवक, माझ्या स्वामीबरोबर बोलण्याचे सामर्थ्य मला कोठून? मला तर मुळी त्राण राहिले नाही; माझ्यात दम राहिला नाही.”


मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो; परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो; तर माझा सेवक मोशे ह्याच्याविरुद्ध बोलायला तुम्हांला भीती कशी नाही वाटली?”


राजदंडाने1 व आपल्या काठ्यांनी सरदारांनी ही विहीर खणली इस्राएलातील अमिरांनी ती खोदली.” मग ते रानातून मत्तनाला गेले;


तेथे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर भोजन करावे आणि ज्या ज्या कामात तुम्ही हात घातला व ज्यात तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला यश दिले त्या सर्वांबद्दल तुम्ही व तुमच्या घरच्या माणसांनी आनंद करावा.


तुम्ही ऐकले त्याप्रमाणे देवाच्या वाणीचे शब्द ऐकूनही दुसरे कोणी लोक जिवंत राहिले आहेत काय?


मानोहा आपल्या स्त्रीला म्हणाला, “आपण खात्रीने मरणार, कारण आपण देवाला पाहिले आहे.”


तेव्हा उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वराचे लोक माझ्यासाठी वीरांविरुद्ध सामना करायला उतरले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan