Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 23:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणी वांझ असणार नाही; आणि मी तुला भरपूर आयुष्य देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणीही वांझ असणार नाही; मी तुला दीर्घायुषी करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 तुमच्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही, ना कोणी वांझ राहणार. तुमचा जीवनकाळ मी पूर्ण करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 23:26
16 Iomraidhean Croise  

अब्राहाम पुर्‍या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला.


मग त्याने प्राण सोडला; तो वृद्ध व पुर्‍या वयाचा होऊन मृत्यू पावला आणि स्वजनांस जाऊन मिळाला; त्याचे मुलगे एसाव आणि याकोब ह्यांनी त्याला मूठमाती दिली.


दावीद आता वृद्ध व वयातीत झाला होता, म्हणून त्याने आपला पुत्र शलमोन ह्याला इस्राएलावर राजा नेमले. लेवी आणि याजक ह्यांची विभागणी व त्यांची कामे


त्यांचा बैल प्रजनन करतो; तो निष्फळ होत नाही; त्यांची गाय विते, गाभटत नाही.


नंतर ईयोब वृद्ध व पुर्‍या वयाचा होऊन मरण पावला.


हंगामाच्या वेळी, धान्याची सुडी आणून ठेवतात, तसा तू पुर्‍या वयाचा होऊन कबरेत जाशील.


तो त्यांना आशीर्वाद देतो, आणि त्यांची फार वाढ होते; त्यांना गुरांची कमतरता पडू देत नाही.


आमची भांडारे भरलेली असावीत; त्यांतून सर्व प्रकारच्या वस्तू मिळाव्यात; आमच्या कुरणांत आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत;


हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील. खुनी व कपटी माणसे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत; मी तर तुझ्यावर भाव ठेवीन.


आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.


ह्यापुढे थोडे दिवस वाचणारे अर्भक तिच्यात जन्मास येणार नाही. जो पुर्‍या आयुष्याचा होणार नाही असा म्हातारा तिच्यात असणार नाही; तेथील जो कोणी तरुणपणी मरेल तो शंभर वर्षांचा होऊन मरेल.


हे परमेश्वरा, त्यांना दे; त्यांना काय देशील? गर्भपात करणारे गर्भाशय व शुष्क स्तन त्यांना दे.


तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स आशीर्वादित होतील.


तुझे व तुझ्यामागून तुझ्या वंशजांचे बरे व्हावे, आणि तुझा देव परमेश्वर जो देश तुला निरंतरचा देत आहे त्यात तू चिरकाळ राहावेस म्हणून आज मी तुला देत असलेले विधी आणि आज्ञा ह्यांचे पालन कर.”


तू सर्व राष्ट्रांपेक्षा अधिक आशीर्वादित होशील; तुझ्यातला किंवा तुझ्या पशूंतला कोणी नर किंवा मादी वांझ राहणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan