Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 23:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 जेव्हा माझा दूत तुझ्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी ह्या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा संहार करीन,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 देव म्हणाला, माझा दूत तुमच्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा नाश करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 माझा दूत तुमच्यापुढे जाईल आणि तुम्हाला अमोरी, हिथी, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी यांच्या देशात पोहचवेल आणि मी त्या सर्वांचा नाश करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 23:23
13 Iomraidhean Croise  

स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन. तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण.


तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी ह्याचा मुलगा शखेम ह्याची नजर तिच्यावर गेली. तो तिला घेऊन गेला आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.


परमेश्वराने इस्राएलांसाठी फारोचे व मिसरी लोकांचे काय केले, वाटेने आपल्याला काय काय त्रास भोगावा लागला, आणि परमेश्वराने आपली सोडवणूक कशी केली ही सर्व हकिकत मोशेने आपल्या सासर्‍याला कळवली.


पाहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचवण्याकरता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवत आहे.


मिसर देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात, तुम्हांला घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळव.


तेव्हा अहरोनाने त्यांना सांगितले की, “तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांच्या कानांतील सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या.”


ह्यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत; त्यांतले प्रतिष्ठित उपाशी मरत आहेत, आणि लोकसमुदाय तृषाक्रांत झाला आहे.


तर आता हे पक्के लक्षात ठेव की, भस्म करणार्‍या अग्नीसारखा तुझ्यापुढे जो पलीकडे जात आहे तो तुझा देव परमेश्वर आहे; तो त्यांचा संहार करील व त्यांना तुझ्यापुढे चीत करील, आणि परमेश्वराने तुला सांगितल्याप्रमाणे तू त्यांना घालवून देऊन त्यांचा त्वरित नाश करशील.


परमेश्वराने तुमच्यापुढून मोठमोठी व बलाढ्य राष्ट्रे घालवून दिली आहेत; तुमच्यासमोर तर आजवर कोणीही टिकला नाही.


यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पाहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, “तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैर्‍यांच्या पक्षाचा?”


हे ऐकून यार्देनेच्या पश्‍चिमेकडे डोंगरवटीत, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या सबंध किनार्‍यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्यांचे सर्व राजे


Lean sinn:

Sanasan


Sanasan