Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 23:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 आपल्या जमिनीच्या प्रथमउत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आपल्या जमिनीच्या प्रथम उपजातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “तुमच्या भूमीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग तुमचे परमेश्वर याहवेह यांच्या भवनात आणावा. “करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 23:19
20 Iomraidhean Croise  

आपापल्या जमिनीचा प्रथमउपज व निरनिराळ्या वृक्षांची प्रथमफळे वर्षानुवर्ष परमेश्वराच्या मंदिरात आणावीत;


आणि नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपले प्रथमजन्मलेले पुत्र, तसेच आपल्या गुराढोरांचे व शेरडामेंढरांचे प्रथमजन्मलेले हे सर्व आमच्या देवाच्या मंदिरात सेवा करणार्‍या याजकांकडे घेऊन यावे;


तू देवाला1 दूषण लावू नकोस. आपल्या राज्यकर्त्याला शिव्याशाप देऊ नकोस.


आपल्या शेताचा उपज व आपल्या फळांचे रस मला अर्पण करण्याची हयगय करू नकोस. तुझ्या मुलांपैकी प्रथमजन्मलेला मला द्यावा.


आपल्या जमिनीच्या प्रथमउत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.”


नीतिमान मनुष्य आपल्या पशूच्या जिवाकडे लक्ष देतो, पण दुर्जनांचे अंतर्याम क्रूर असते.


तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वराचा सन्मान कर;


लोकांचे विधी व्यर्थ आहेत; अरण्यातून कोणी तोडून आणलेले ते काष्ठच होय, ते कारागिराच्या हातच्या हत्याराने केलेले काम आहे.


सर्व प्रथमफळांचा प्रथमभाग, समर्पित अंश म्हणून अर्पण करायची प्रत्येक वस्तू याजकांची व्हावी; तुम्ही तिंबलेल्या कणकेचा पहिला गोळा याजकांना द्यावा म्हणजे तुमच्या घराला बरकत येईल.


आणि याजकांच्या विभागास लागून पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद असा विभाग लेव्यांना मिळावा; त्याची सबंध लांबी पंचवीस हजार हात व रुंदी दहा हजार हात असावी.


त्यांनी त्यातला काही विकू नये व त्याची अदलाबदल करू नये; तसेच देशातील प्रथमफळे इतरांकडे जाऊ देऊ नयेत; कारण तो भाग परमेश्वराला पवित्र आहे.


मळलेल्या कणकेतून पहिला काही भाग तुम्ही समर्पण म्हणून परमेश्वराला पिढ्यानपिढ्या द्यावा.


तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहेच; तो महानिद्रा घेणार्‍यांतले प्रथमफळ असा आहे.


आपोआप मेलेले काहीही तुम्ही खाऊ नये; तुमच्या वेशीच्या आत असलेल्या उपर्‍याला ते खायला द्यावे किंवा परक्याला विकून टाकावे; कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.


आता, हे परमेश्वरा, जमिनीचे प्रथमउत्पन्न, तू मला दिले आहेस त्यातले काही मी तुला आणले आहे.’ मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर ती पाटी खाली ठेवून त्याला दंडवत घाल;


आणि तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथमउत्पन्न तू घरी आणशील, तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या नावाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा.


स्त्रीसंगाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकर्‍यासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan