Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 23:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्या सणात माझ्या आज्ञेप्रमाणे अबीब महिन्यातील नेमलेल्या समयी सात दिवस तू बेखमीर भाकरी खा, कारण त्याच महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्यामध्ये सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “बेखमीर भाकरीचा सण पाळावा; मी तुम्हाला आज्ञापिल्याप्रमाणे, सात दिवस बेखमीर भाकर खा. अवीव महिन्यात नेमलेल्या वेळेत असे करावे, कारण त्या महिन्यात तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला. “माझ्यासमोर कोणीही रिकाम्या हाताने येऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 23:15
25 Iomraidhean Croise  

“हा महिना तुम्हांला आरंभीचा महिना व्हावा; तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा.


मोशे लोकांना म्हणाला, “ह्या दिवसाची आठवण ठेवा; ह्याच दिवशी तुम्ही मिसरातून, दास्यगृहातून बाहेर निघालात; परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हांला ह्या ठिकाणातून बाहेर आणले म्हणून ह्या दिवशी खमिराची भाकर खायची नाही.


तुम्ही अबीब महिन्याच्या ह्या दिवशी निघाला आहात,


आपल्या शेताचा उपज व आपल्या फळांचे रस मला अर्पण करण्याची हयगय करू नकोस. तुझ्या मुलांपैकी प्रथमजन्मलेला मला द्यावा.


बेखमीर भाकरीचा सण पाळ. माझ्या आज्ञेला अनुसरून अबीब महिन्याच्या नेमलेल्या समयी सात दिवसपर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास.


गाढवीचे पहिले शिंगरू खंडणीदाखल एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे; त्याला तसे सोडवले नाही, तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावे. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.


“इस्राएल लोकांना सांग : मी तुम्हांला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहचाल व त्यातील पीक कापाल, तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी;


“मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबली, एका वर्षाची वासरे घेऊन त्याच्यापुढे येऊ काय?


बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारत असत; त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?”


त्याचे आईबाप दरवर्षी वल्हांडण सणास यरुशलेमेस जात असत.


नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला.


ते यहूदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते.


तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून तीनदा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मांडवांचा सण ह्या तिन्ही सणांत तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्याच्यासमोर हजर राहावे; पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये;


ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश तुम्ही माघारी पाठवणार तर तो नुसता पाठवू नका; त्याबरोबर त्याला दोषार्पणाचा बली अवश्य पाठवा म्हणजे तुम्ही बरे व्हाल व अद्यापि तुमच्यावरला त्याचा हात का निघत नाही हे तुम्हांला कळेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan