Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 23:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 सहा दिवस तू आपला उद्योग कर व सातव्या दिवशी विश्रांती घे, म्हणजे तुझे बैल आणि तुझे गाढव ह्यांना विसावा मिळेल आणि तुझ्या दासीची संतती आणि उपरा ह्यांचा जीव ताजातवाना होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तुम्ही सहा दिवस काम करावे, व सातव्या दिवशी विसावा घ्यावा; त्यामुळे तुमच्या गुलामांना व इतर उपऱ्यांनाही विसावा मिळेल व त्यांना ताजेतवाने वाटेल; तुमच्या बैलांना व गाढवानांही विसावा मिळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “सहा दिवस आपले काम करावे, पण सातव्या दिवशी काम करू नये, अशासाठी की तुमच्या बैलांना व गाढवांना विसावा मिळावा, तसेच तुमच्या घरात जन्मलेले गुलाम आणि तुमच्यामध्ये राहणारा परदेशी सुद्धा ताजेतवाने होऊ शकेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 23:12
13 Iomraidhean Croise  

तेथे सोरकरही राहत असत; ते मासे व नाना प्रकारचे पदार्थ आणून शब्बाथ दिवशी यहूदी लोक व यरुशलेमकर ह्यांना विकत असत.


तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विसाव्याचा दिवस, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे; तुम्हांला भाजायचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा. जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवा.”


पण सातव्या वर्षी ती पडीत राहू दे, म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तीत उगवलेले खातील; त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशू खातील. तुझे द्राक्षमळे व जैतुनवने ह्यांविषयीही तसेच कर.


सहा दिवस तू आपले कामकाज कर, पण सातव्या दिवशी विसावा घे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही विसावा घे.


सहा दिवस काम करावे, पण सातवा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बाथ होय; त्या दिवशी जो कोणी काम करील त्याला जिवे मारावे.


शब्बाथ दिवशी तुम्ही आपल्या वसतिस्थानांत विस्तव पेटवू नये.


‘आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जिवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस?’ “पाहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाडकष्ट करवता.


सहा दिवस कामकाज करावे, पण सातवा दिवस परमविश्रामाचा शब्बाथ व पवित्र मेळ्याचा दिवस होय; ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये; तुमच्या सर्व घराघरांतून हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.


आणखी तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शब्बाथासाठी झालेला नाही;


येशूने शब्बाथ दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, “ज्यांत काम केले पाहिजे असे सहा दिवस आहेत; तर त्या दिवसांत येऊन बरे होऊन जात जा, शब्बाथ दिवशी येऊ नका.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan