निर्गम 22:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण कोणत्याही प्रकारची आगळीक घडली, मग ती बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र, अथवा कोणतीही गमावलेली वस्तू हिच्यासंबंधीची असो, आणि ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली, तर दोघांचे प्रकरण देवासमोर1 यावे व ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजार्याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जर हरवलेला एखादा बैल, एखादे गाढव, मेंढरू किंवा वस्त्र यांच्यासंबंधी दोन मनुष्यात वाद उत्पन्न झाला, आणि ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली तर त्या हक्क सांगणाऱ्या दोन्ही पक्षांनी देवासमोर यावे; ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजाऱ्याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 एखादे बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र किंवा एखादी हरवलेली वस्तू असे काहीही असो, ज्याबद्दल कोणी कलहाने बेकायदेशीरपणे म्हणतो की, ‘हे माझे आहे,’ तर त्या दोघांचाही वाद न्यायाधीशासमोर आणावा. ज्या कोणाला न्यायाधीश दोषी ठरवेल त्याने दुसर्याला दुपटीने परत करावे. Faic an caibideil |
तुमचे भाऊबंद जे आपापल्या नगरात राहत आहेत, त्यांच्यापैकी कोणाचा वाद तुमच्यापुढे आला तर, तो मग खुनाचा असो; किंवा नियमशास्त्र, आज्ञा, नियम व निर्णय ह्यांच्यासंबंधीचा असो; तुम्ही त्यांना असे बजावून सांगा की तुम्ही परमेश्वराचा अपराध करू नका; केला तर तुमच्यावर व तुमच्या बांधवांवर त्याचा कोप होईल; असे करा म्हणजे तुम्हांला दोष लागणार नाही.