Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 22:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 पण चोर सापडला नाही तर घरधन्याला देवासमोर1 घेऊन जावे, म्हणजे त्याने आपल्या शेजार्‍याच्या मालमत्तेला स्वत: हात लावला किंवा नाही ह्याचा निर्णय होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परंतु जर चोर सापडला नाही, तर घरमालकाला देवासमोर घेऊन जावे म्हणजे मग त्याने स्वतः त्या वस्तुला हात लावला की नाही त्याचा न्याय होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 पण जर चोर सापडला नाही तर घरमालकाने न्यायाधीशासमोर हजर व्हावे आणि शेजार्‍याच्या सामानावर त्याने हात टाकला नाही हे सिद्ध करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 22:8
9 Iomraidhean Croise  

एखाद्याने आपल्या शेजार्‍याचा अपराध केल्यामुळे त्याला शपथ घ्यायला लावली, आणि ती ह्या मंदिरात तुझ्या वेदीसमोर त्याने घेतली,


त्यांतले चोवीस हजार परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले; सहा हजार अंमलदार व न्यायाधीश होते;


देव आपल्या मंडळीत उभा आहे; तो सत्ताधीशांमध्ये1 न्याय करतो;


तर त्याच्या धन्याने त्याला देवासमोर1 आणून दाराजवळ किंवा दाराच्या चौकटीजवळ उभे करावे व आरीने त्याचा कान टोचावा म्हणजे तो आयुष्यभर त्याची चाकरी करील.


तू देवाला1 दूषण लावू नकोस. आपल्या राज्यकर्त्याला शिव्याशाप देऊ नकोस.


कारण कोणत्याही प्रकारची आगळीक घडली, मग ती बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र, अथवा कोणतीही गमावलेली वस्तू हिच्यासंबंधीची असो, आणि ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली, तर दोघांचे प्रकरण देवासमोर1 यावे व ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजार्‍याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा.


तुझा देव परमेश्वर तुला जी नगरे देईल तेथे आपापल्या वंशांप्रमाणे तू न्यायाधीश व अंमलदार नेमावेस; त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan