Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 22:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तुझ्याजवळ राहणार्‍या माझ्या लोकांपैकी कोणा कंगालाला तू पैसे उसने दिले, तर तू त्याच्याशी सावकाराप्रमाणे वागू नकोस, व त्याच्यापासून व्याज घेऊ नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या एखाद्या गरीब मनुष्यास तुम्ही उसने पैसे दिले तर त्याबद्दल तुम्ही व्याज आकारू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 “तुमच्यामध्ये असलेल्या माझ्या गरजवंत लोकांना जर तुम्ही उसने पैसे दिले, तर त्यांच्याशी सावकारी व्यवहार करू नका; व व्याज लावू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 22:25
20 Iomraidhean Croise  

एकदा संदेष्ट्याच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलीशाकडे गार्‍हाणे केले; ती म्हणाली, “तुझा सेवक, माझा नवरा, मरून गेला आहे; तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे.”


तिने जाऊन देवाच्या माणसाला हे सांगितले. तो म्हणाला, “जा, तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर.” अलीशा व शूनेम येथील स्त्री


मग मी आपल्या मनात विचार करून सरदार व शास्ते ह्यांच्याशी वाद करून म्हणालो की, “तुम्ही आपल्या बांधवांकडून वाढीदिढी घेता.” मग मी त्यांच्याविरुद्ध एक मोठी सभा भरवली.


आपला पैसा वाढीदिढीला लावत नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरता लाच घेत नाही, तो; जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.


जो आपले धन वाढीदिढीने वाढवतो, तो ते गरिबांवर दया करण्यासाठी साठवतो.


अगे माझ्या आई! हायहाय! सर्व जगाबरोबर झगडा व विवाद करणार्‍या अशा मला तू जन्म दिला आहेस. मी कोणाशी वाढीदिढीचा व्यवहार केला नाही व कोणी माझ्याशी केला नाही; तरी सर्व मला शाप देतात.


वाढीदिढी केली, व्याज घेतले, तर असला मनुष्य वाचेल काय? तो वाचायचा नाही; त्याने ही सर्व अमंगळ कृत्ये केली आहेत; तो खातरीने मरेल; त्याने केलेला रक्तपात त्याच्यावरच उलटेल.


दीनाची हानी करण्यापासून आपला हात आवरतो, वाढीदिढी करत नाही, व्याज घेत नाही, माझे निर्णय पाळतो, माझ्या नियमांप्रमाणे चालतो, तो आपल्या बापाच्या अधर्मामुळे मरायचा नाही, तो खातरीने वाचेल.


कोणावर जुलूम करत नाही, कर्जदाराचे गहाण त्याला परत करतो, कोणाला लुटत नाही, भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र लेववतो,


वाढीदिढी करत नाही, व्याज घेत नाही, वाइटापासून आपला हात आवरतो, मनुष्यामनुष्यात सत्य निर्णय करतो,


तुझ्या ठायी रक्तपात करावा म्हणून ते लाच घेतात; तू व्याजबट्टा करतेस, जुलूम करून आपल्या शेजार्‍यास नागवतेस व मला विसरली आहेस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


गहाण घेतलेली वस्त्रे घालून ते प्रत्येक वेदीजवळ निजतात आणि आपल्या दैवतांच्या1 मंदिरात घेतलेल्या दंडाचा द्राक्षारस प्राशन करतात.


तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते.


मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असतास तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’


तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यातल्या कोणत्याही गावात एखादा दरिद्री बांधव तुमच्यामध्ये राहत असला, तर त्या दरिद्री बांधवाबाबत आपले हृदय कठोर करू नकोस, किंवा आपला हात आखडू नकोस,


सूर्य मावळत आहे तोच त्याचे तारण त्याला अवश्य परत कर म्हणजे तो आपले वस्त्र अंगावर घेऊन निजेल आणि तुझे अभीष्ट चिंतील; आणि तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुझे नीतिमत्त्व ठरेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan