Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 22:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 आणि माझा राग भडकून मी तलवारीने तुमचा वध करीन. मग तुमच्या स्त्रिया विधवा होतील आणि तुमची बालके पोरकी होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 व माझा राग तुम्हावर भडकेल व मी तुम्हास तलवारीने मारून टाकीन म्हणजे तुमच्या स्रिया विधवा व तुमची मुले पोरकी होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 मग माझा क्रोध पेटेल आणि मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन; आणि तुमची पत्नी विधवा व तुमची लेकरे अनाथ होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 22:24
21 Iomraidhean Croise  

मग मी आपल्या मनात विचार करून सरदार व शास्ते ह्यांच्याशी वाद करून म्हणालो की, “तुम्ही आपल्या बांधवांकडून वाढीदिढी घेता.” मग मी त्यांच्याविरुद्ध एक मोठी सभा भरवली.


देवापासून येणार्‍या विपत्तीचा मला धाक असे; त्याच्या प्रभावापुढे माझे काही चालत नसे.


कारण दुष्टांनी व कपटी जनांनी माझ्यावर तोंड सोडले आहे; ते खोडसाळ जिभेने माझ्याविरुद्ध बोलले आहेत.


त्याची मुले अनाथ होवोत, व त्याची बायको विधवा होवो.


आपला पैसा वाढीदिढीला लावत नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरता लाच घेत नाही, तो; जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.


तू त्यांच्यावर आपल्या क्रोधाचा मारा कर, तुझा कोपाग्नी त्यांना गाठो.


तुझे, केवळ तुझेच, भय धरले पाहिजे; तुला एकदा क्रोध आला म्हणजे तुझ्यापुढे कोण उभा राहील?


तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते? आणि तुझे भय बाळगण्याइतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे?


माझ्यासमोर त्यांच्या विधवा सागराच्या वाळूपेक्षा अधिक झाल्या आहेत; मी भरदुपारी त्यांच्यावर व तरुणांच्या मातेवर लुटारू आणतो; तिच्यावर क्लेश व त्रेधा ही अकस्मात ओढवतील असे मी करतो.


ह्यामुळे त्यांचे पुत्र दुष्काळात सापडू दे; त्यांना तलवारीच्या तडाक्यात सापडू दे; त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होवोत, मृत्यू त्यांचे पुरुष ठार करो; त्यांचे तरुण लढाईत तलवारीने पडोत.


आम्ही पोरके, पितृहीन आहोत; आमच्या माता जशा काय विधवा आहेत.


तुझा एखादा भाऊबंद कंगाल झाला आणि त्याच्याने काम होत नाही असे तुला दिसले तर तू त्याला आधार द्यावास. परक्याप्रमाणे अथवा उपर्‍याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे.


त्याच्यापासून व्याज अथवा वरताळा घेऊ नकोस; आपल्या देवाचे भय धरून आपल्याजवळ आपल्या भाऊबंदाला राहू दे.


त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.


द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल; चांगले माप दाबून, हलवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल.”


वाटल्यास परदेशीयाशी वाढीदिढीचा व्यवहार कर, पण आपल्या बांधवाशी करू नकोस, म्हणजे जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे ज्या ज्या कामाला तू हात घालशील त्यात तुझा देव परमेश्वर तुला आशीर्वाद देईल.


तू आपला देव परमेश्वर ह्याला नवस करशील तेव्हा तो फेडण्यास विलंब लावू नकोस, कारण तुझा देव परमेश्वर तुला त्याचा अवश्य जाब विचारील; विलंब लावल्यास तुला पाप लागेल.


जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan