Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 22:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 परमेश्वराशिवाय दुसर्‍या दैवतांना बली अर्पण करणार्‍याचा अगदी संहार करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 परमेश्वराशिवाय दुसऱ्या दैवतांना बली करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 “याहवेह परमेश्वराशिवाय इतर दैवतांना अर्पणे करणार्‍यांचा नाश करून टाकावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 22:20
20 Iomraidhean Croise  

एलीया त्यांना म्हणाला, “बआलाच्या संदेष्ट्यांना पकडा; त्यांच्यातल्या एकालाही निसटून जाऊ देऊ नका.” तेव्हा त्यांनी त्यांना पकडले; एलीयाने त्यांना खाली किशोन ओहळानजीक आणून वधले.


होमबली अर्पण करण्याचे संपले तेव्हा येहूने पहारेकर्‍यांना व सरदारांना सांगितले की, “आत जाऊन त्यांचा वध करा; एकालाही बाहेर येऊ देऊ नका.” तेव्हा त्यांनी तलवारीच्या धारेखाली त्यांचा संहार केला; त्या पहारेकर्‍यांनी व सरदारांनी त्यांना बाहेर फेकून दिले आणि बआलाच्या देवळाच्या गढीत ते गेले.


लहान असो की थोर असो, स्त्री असो की पुरुष असो, जो कोणी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला शरण जाणार नाही त्याचा वध व्हावा.


उपर्‍यावर जुलूम करू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हांला जाणीव आहे; कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता. सातवे वर्ष आणि शब्बाथ


ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली. त्याला बली अर्पण केले. ‘हे इस्राएला, ज्यांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव,’ असे ते म्हणू लागले आहेत.”


तू सावध राहा. देशातील रहिवाशांशी तुला करारमदार करायचा नाही; नाहीतर ते व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांना बलिदान करतील, आणि त्यांच्यातल्या कोणी तुला बोलावले असता तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील;


तेव्हा मी त्यांना म्हटले, तुम्ही सर्वांनी आपल्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू फेकून द्याव्यात व मिसर देशाच्या मूर्तींनी आपणांस विटाळ होऊ देऊ नये; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


आणि ह्यामुळे व्यभिचारी मतीने अजदैवतांच्या (बोकड) मागे लागून त्यांना त्यांनी आपले यज्ञपशू अर्पण करू नयेत; हा तुम्हांला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहत असला तर त्याला उपद्रव देऊ नका.


मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.


इस्राएलाचे हे म्हणणे ऐकून परमेश्वराने कनानी लोकांना त्याच्या हाती दिले आणि त्याने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला; म्हणून त्या ठिकाणाचे नाव हर्मा (म्हणजे विनाश) असे पडले.


तो अनाथ व विधवा ह्यांचा न्याय करतो आणि परदेशीयावर प्रीती करून त्याला अन्नवस्त्र पुरवतो.


पण जो संदेष्टा उन्मत्त होऊन जे बोलायची आज्ञा मी त्याला दिली नाही ते वचन माझ्या नावाने बोलेल अथवा जो अन्य देवांच्या नावाने बोलेल तो संदेष्टा प्राणास मुकेल.’


त्यांच्या तिसर्‍या पिढीत जन्मलेल्या लोकांना परमेश्वराच्या मेळ्यास येण्याची परवानगी आहे.


उपर्‍याच्या अथवा अनाथाच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नकोस; विधवेचे वस्त्र गहाण ठेवून घेऊ नकोस,


Lean sinn:

Sanasan


Sanasan