Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 22:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 कोणी आपल्या शेजार्‍यापासून कोणतेही जनावर मागून घेतले आणि त्याचा धनी बरोबर नसताना त्याला दुखापत झाली अथवा ते मरून गेले तर त्याने त्या धन्याला त्याची भरपाई अवश्य करून दिली पाहिजे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जर कोणी आपल्या शेजाऱ्याकडून त्याचे जनावर मागून घेतले मालक तेथे हजर नसताना त्या जनावराला जर इजा झाली किंवा ते मरण पावले तर त्या मालकाला त्याची किंमत अवश्य भरून द्यावी;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “जर कोणी आपल्या शेजार्‍याकडून जनावर उसने घेतो व जनावराचा मालक तिथे नसताना ते जनावर जखमी झाले किंवा मेले, तर त्याने त्याची भरपाई त्याला द्यावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 22:14
11 Iomraidhean Croise  

दुसरे कित्येक म्हणू लागले की, “राजाचा कर भरण्यासाठी आमच्या शेतांवर व द्राक्षांच्या मळ्यांवर आम्ही पैसा काढला आहे.


दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही; नीतिमान उदारपणे वागतो व दान देतो.


तर खड्ड्याच्या मालकाने झालेले नुकसान भरून द्यावे; जनावराच्या धन्याला त्याचे मोल द्यावे आणि मेलेले जनावर खड्ड्याच्या मालकाचे व्हावे.


तर त्या दोघांमध्ये परमेश्वराची शपथ व्हावी. आपण शेजार्‍याच्या मालमत्तेला हात लावला नाही असे राखणार्‍याने म्हटल्यास त्या मालमत्तेच्या मालकाने ते खरे मानावे; मग त्याला भरपाई करून द्यावी लागणार नाही.


ते जनावर जर कोणी खरोखर फाडून टाकले असेल, तर त्याने ते पुराव्यादाखल आणावे; म्हणजे त्याला भरपाई करून द्यावी लागणार नाही.


पण त्याचा धनी बरोबर असला तर त्याची भरपाई करावी लागणार नाही; ते भाड्याने घेतले असले तर त्याचे नुकसान भाड्यातच आलेले असते.


जर कोणी एखाद्या ग्रामपशूला ठार मारले तर त्याने त्याच्याबदली दुसरा प्राणी देऊन भरपाई करावी.


जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस.


तुम्ही तर आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न व दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे.


कर्जमाफी करण्याची रीत ही : धनकोने आपल्या शेजार्‍याला दिलेले कर्ज माफ करावे; आपला शेजारी अथवा भाऊबंद ह्यांच्यापासून ते वसूल करून घेऊ नये; कारण परमेश्वराच्या नावाने कर्जमाफी जाहीर झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan