Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 22:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कोणी आपल्या शेजार्‍याजवळ गाढव, बैल, मेंढरू अथवा दुसरे कोणतेही जनावर राखणीस ठेवले आणि जर ते मेले अथवा त्याला काही इजा झाली किंवा कोणी हाकून नेताना ते कोणाच्या दृष्टीस पडले नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 एखाद्याने आपले गाढव, बैल, किंवा मेंढरू थोडे दिवस सांभाळण्याकरता आपल्या शेजाऱ्याकडे दिले, परंतु ते जर मरण पावले, किंवा जखमी झाले किंवा कोणी पाहत नसताना पकडून नेले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “जर कोणी आपले गाढव, बैल, मेंढरू किंवा कोणतेही जनावर आपल्या शेजार्‍याकडे सुरक्षित राहावे म्हणून ठेवले आणि ते मेले किंवा त्याला काही इजा झाली किंवा त्याच्यावर नजर नसताना त्याला कोणी घेऊन गेले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 22:10
6 Iomraidhean Croise  

पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, “हे पाहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे ह्याचे माझ्या धन्याला भानसुद्धा नाही; आपले सर्वकाही त्याने माझ्या हाती दिले आहे.


तर त्या दोघांमध्ये परमेश्वराची शपथ व्हावी. आपण शेजार्‍याच्या मालमत्तेला हात लावला नाही असे राखणार्‍याने म्हटल्यास त्या मालमत्तेच्या मालकाने ते खरे मानावे; मग त्याला भरपाई करून द्यावी लागणार नाही.


कारण कोणत्याही प्रकारची आगळीक घडली, मग ती बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र, अथवा कोणतीही गमावलेली वस्तू हिच्यासंबंधीची असो, आणि ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली, तर दोघांचे प्रकरण देवासमोर1 यावे व ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजार्‍याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा.


परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील.


म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाहीत तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल?


ह्या कारणाने ही दुःखे मी सोसत आहे, तरी मी लाज धरत नाही. कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे असा माझा भरवसा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan