Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 21:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तर त्याच्या धन्याने त्याला देवासमोर1 आणून दाराजवळ किंवा दाराच्या चौकटीजवळ उभे करावे व आरीने त्याचा कान टोचावा म्हणजे तो आयुष्यभर त्याची चाकरी करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तर त्याच्या मालकाने त्यास देवासमोर अथवा त्यास दाराच्या चौकटीजवळ उभे करावे व अरीने त्याचा कान टोचावा. मग तो त्याची आयुष्यभर चाकरी करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तर त्याच्या मालकाने त्याला न्यायाधीशांसमोर आणावे. मग त्याने त्याला दरवाजाकडे किंवा दरवाजाच्या चौकटीजवळ आणावे व आरीने त्याचा कान टोचावा. यानंतर तो त्याचा जीवनभर गुलाम म्हणून राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 21:6
24 Iomraidhean Croise  

ते त्याला म्हणाले, “आपण ह्या लोकांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल आणि त्यांना मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर ते आपले सर्वकाळ सेवक होऊन राहतील.”


देव आपल्या मंडळीत उभा आहे; तो सत्ताधीशांमध्ये1 न्याय करतो;


कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशू ह्या सर्वांचे प्रथमजन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन; मी परमेश्वर आहे.


माणसे आपसात झोंबाझोंबी करीत असताना एखाद्या गर्भवती स्त्रीला मार लागून तिचा गर्भपात झाला, पण तिला दुसरी काही इजा पोहचली नाही, तर त्या स्त्रीचा पती लादेल तो दंड त्याला करावा, आणि न्यायाधीशांच्या ठरावाप्रमाणे2 त्याने तो भरावा.


पण जर तो दास स्पष्टपणे म्हणेल की, माझ्या धन्यावर व माझ्या बायकोमुलांवर मी प्रेम करतो, मी मुक्त होऊन जाणार नाही,


कोणी आपली मुलगी दासी म्हणून विकली तर तिने दासांप्रमाणे निघून जाता कामा नये.


तू देवाला1 दूषण लावू नकोस. आपल्या राज्यकर्त्याला शिव्याशाप देऊ नकोस.


आणि मी तुझ्यावर पूर्वीप्रमाणे न्यायाधीश व आरंभीच्याप्रमाणे मंत्री पुन्हा नेमीन; आणि मग तुला नीतिमत्तेची नगरी, विश्वासू नगरी म्हणतील.”


जमीन विकायची तर ती कायमची विकून टाकू नका, कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके व उपरे आहात;


मजुराप्रमाणे किंवा उपर्‍याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे; योबेलवर्षापर्यंत त्याने तुझी सेवाचाकरी करावी.


तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत, ते सकाळपर्यंत काही शिल्लक राहू देत नाहीत.


त्या वेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली की, ‘तुम्ही आपापल्या भाऊबंदांचे वाद ऐका; एखादा माणूस व त्याचा भाऊबंद व त्याच्याजवळचा उपरा ह्यांच्यामध्ये नीतीने न्याय करा.


तरीपण त्या दासाचा लोभ तुझ्यावर व तुझ्या घराण्यावर जडला असेल व तो आनंदाने तुझ्याबरोबर राहत असून तुला म्हणेल की, ‘मी तुला सोडून जाणार नाही,’


तर त्याचा कान दरवाजावर धरून आरीने टोच म्हणजे तो तुझा कायमचा दास होईल, असेच तुझ्या दासीबाबतही कर.


तुझा देव परमेश्वर तुला जी नगरे देईल तेथे आपापल्या वंशांप्रमाणे तू न्यायाधीश व अंमलदार नेमावेस; त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा.


हन्ना तेवढी गेली नाही; ती आपल्या पतीला म्हणाली, “बालकाचे दूध तुटेपर्यंत मी थांबते. मग मी त्याला घेऊन जाईन म्हणजे तो परमेश्वरासमोर हजर होऊन तेथे निरंतर राहील.”


आखीशाने दाविदाच्या बोलण्यावर भरवसा ठेवून म्हटले, “ह्याने इस्राएल लोकांना आपला अगदी वीट येईलसे केले आहे; तर आता हा निरंतर आपला दास होऊन राहील.”


दावीद आखीशाला म्हणाला, “आपला दास काय करील ते आपल्याला आता समजून येईल.” आखीश दाविदाला म्हणाला, “म्हणूनच मी तुला माझे शिर सलामत राखायला कायमचा ठेवून घेतो.” शौल आणि एन-दोर येथील भूतविद्याप्रवीण स्त्री


Lean sinn:

Sanasan


Sanasan