Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 21:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 तर खड्ड्याच्या मालकाने झालेले नुकसान भरून द्यावे; जनावराच्या धन्याला त्याचे मोल द्यावे आणि मेलेले जनावर खड्ड्याच्या मालकाचे व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 त्याने त्या जनावराच्या मालकाला भरपाई म्हणून त्याची किंमत द्यावी आणि ते मरण पावलेले जनावर खड्ड्याच्या मालकाचे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 तर ज्याने तो खड्डा उघडला त्याने जनावराच्या मालकाला त्याची किंमत मोजून द्यावी व त्याबदल्यात ते मेलेले जनावर घ्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 21:34
9 Iomraidhean Croise  

त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामाया वाटली नाही म्हणून त्याने त्या मेंढीच्या चौपट बदला दिला पाहिजे.”


एखाद्या मनुष्याने बुजलेला खड्डा उकरला किंवा नवा खड्डा खणला आणि त्याच्यावर झाकण न ठेवल्यामुळे त्यात कोणाचा बैल किंवा गाढव पडून मेले,


एखाद्याच्या बैलाने दुसर्‍याच्या बैलाला दुखापत करून मारून टाकले, तर जिवंत राहिलेला बैल विकून त्याचा पैसा दोन मालकांनी सारखा वाटून घ्यावा; मेलेला बैलही त्यांनी वाटून घ्यावा.


कोणी आपल्या शेजार्‍यापासून कोणतेही जनावर मागून घेतले आणि त्याचा धनी बरोबर नसताना त्याला दुखापत झाली अथवा ते मरून गेले तर त्याने त्या धन्याला त्याची भरपाई अवश्य करून दिली पाहिजे.


पण तो चोरी करत असता सूर्योदय झाला, तर मारणार्‍यावर खुनाचा दोष येईल. चोराने नुकसान अवश्य भरून द्यावे; तो कंगाल असला तर चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी.


आग भडकून काटेकुटे पेटले आणि त्यामुळे धान्याच्या सुड्या, उभे पीक अथवा शेत जळून गेले, तर ज्याने आग पेटवली असेल त्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे.


पण तो सापडला तर सातपट परत देईल; तो आपल्या घरची सर्व मालमत्ता देईल.


तो दुर्जन गहाण परत करील, हरण केलेले परत देईल, आणि काहीएक अधर्म न करता जीवनाच्या नियमांप्रमाणे चालेल तर तो जगेलच, मरायचा नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan