निर्गम 21:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तथापि त्या बैलाला आधीचीच हुंदडण्याची सवय असेल आणि त्याच्या धन्याला त्याबद्दल सूचना केली असूनही त्याने त्याला आवरले नाही, आणि मग त्या बैलाने कोणा पुरुषाला किंवा स्त्रीला मारून टाकले, तर त्याला दगडमार करावा आणि त्याच्या धन्यालाही जिवे मारावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परंतु त्या बैलाला हुंदडण्याची सवयच असली आणि त्याविषयी त्याच्या मालकाला सूचना केली असूनही त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही आणि त्यानंतर कोणा पुरुषाला किंवा स्त्रीला त्याने जिवे मारले तर त्याबद्दल त्याचा मालक दोषी आहे, त्या बैलाला धोंडमार करून जिवे मारावे व त्याच्या मालकालाही जिवे मारावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 पण बैल मारका आहे याबद्दल त्याच्या मालकाला सूचना देऊनही त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही व तो एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला मारून टाकतो, तर त्या बैलाला धोंडमार करावी व त्याच्या मालकास सुद्धा जिवे मारावे. Faic an caibideil |