Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 21:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 पण जर कोणी जाणूनबुजून आपल्या शेजार्‍यावर चालून गेला व कपटाने त्याचा घात केला, तर त्याचा वध करण्यासाठी माझ्या वेदीपासूनदेखील त्याला घेऊन जावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून व ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या मनुष्यास ठार मारले तर मात्र त्यास शिक्षा करावी; त्यास वेदीपासून खेचून आणून ठार मारावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 पण कोणी जर कपटाने एखाद्याचा वध केला, तर त्याला माझ्या वेदीकडे नेऊन मृत्युदंड द्यावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 21:14
18 Iomraidhean Croise  

अबनेर हेब्रोनास परत आला तेव्हा त्याच्याशी एकान्ती बोलण्यासाठी म्हणून यवाब त्याला वेशीच्या आत घेऊन गेला; तेथे आपला भाऊ असाएल ह्याच्या रक्तपाताचा सूड उगवण्यासाठी त्याने अबनेराच्या पोटावर असा वार केला की तो प्राणास मुकला.


मग यहोयादा याजकाने सेनेवर असलेल्या शतपतींना आज्ञा केली की, “तिला सेनेच्या रांगेतून बाहेर काढा, तिच्यामागून जो जाईल त्याचा वध करा.” कारण याजकाने असे सांगितले आहे की, ”परमेश्वराच्या मंदिरात तिचा वध होऊ नये.”


तसेच धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर; त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन. आणि महापातकापासून अलिप्त राहीन.


कोणी आपल्या बापाला किंवा आईला मारहाण केली तर त्याला अवश्य जिवे मारावे.


रक्तपाताच्या दोषाचा ज्याला भार झाला आहे. तो शवगर्तेकडे धावतो; त्याला धरू नकोस.


तथापि एखाद्याने लोखंडी शस्त्राने कोणावर प्रहार केला आणि तो मेला तर त्याला खुनी समजावे; अशा खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.


त्याप्रमाणे मी तुम्हांला सांगितले, पण तुम्ही ऐकले नाही; उलट तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढून गेलात.


तर कोणी संदेष्टा परमेश्वराच्या नावाने काही बोलला आणि त्याप्रमाणे घडले नाही किंवा प्रत्ययास आले नाही तर परमेश्वराचे ते बोलणे नव्हते असे समजावे; तो संदेष्टा उन्मत्त होऊन बोलला आहे; तू त्याची भीती बाळगू नकोस.


‘जो आपल्या शेजार्‍याला गुप्तपणे ठार मारतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले तर पापांबद्दल ह्यापुढे यज्ञ व्हायचा राहिला नाही;


विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. ते उद्धट, स्वच्छंदी, थोरांची निंदा करण्यास न भिणारे, असे आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan