Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 21:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 आता जे नियम तू त्यांना लावून द्यावेत ते हेच :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आता जे इतर नियम तू इस्राएल लोकांस लावून द्यावेत ते हेच:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “तू त्यांच्यासमोर मांडावयाचे नियम हे आहेत:

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 21:1
27 Iomraidhean Croise  

“तू हे मंदिर बांधत आहेस, त्या अर्थी तू माझ्या नियमांप्रमाणे चाललास, माझे निर्णय पाळलेस व माझ्या सर्व आज्ञा मानून त्याप्रमाणे वागलास तर मी जे वचन तुझा बाप दावीद ह्याला दिले ते तुझ्याशी कायम करीन.


तुमचे भाऊबंद जे आपापल्या नगरात राहत आहेत, त्यांच्यापैकी कोणाचा वाद तुमच्यापुढे आला तर, तो मग खुनाचा असो; किंवा नियमशास्त्र, आज्ञा, नियम व निर्णय ह्यांच्यासंबंधीचा असो; तुम्ही त्यांना असे बजावून सांगा की तुम्ही परमेश्वराचा अपराध करू नका; केला तर तुमच्यावर व तुमच्या बांधवांवर त्याचा कोप होईल; असे करा म्हणजे तुम्हांला दोष लागणार नाही.


आपले भाऊबंद व महाजन ह्यांच्याशी एकचित्त होऊन आणभाक केली की जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे ह्याच्या द्वारे देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही वागू आणि आमचा प्रभू परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा, निर्णय व नियम लक्षपूर्वक पाळू; असे न केल्यास आम्हांला शाप लागो.


तो याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय विदित करतो.


मग मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना बोलावले आणि परमेश्वराने त्याला आज्ञापिलेले हे सर्व शब्द त्यांच्यापुढे मांडले.


मी त्यांना आपले नियम लावून दिले, माझे निर्णय त्यांना दाखवून दिले; हे जो कोणी पाळील तो त्यायोगे वाचेल.


तेव्हा जे चांगले नाहीत असे नियम मी त्यांना दिले, ज्यांनी ते जगायचे नाहीत असे निर्णय त्यांना दिले.


ह्याकरता तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत. स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यांच्यापैकी कोणीही असली अमंगळ कृत्ये करू नयेत;


म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावेत; ते जो पाळील तो त्यांच्या योगे जिवंत राहील; मी परमेश्वर आहे.


म्हणून तुम्ही माझे सर्व विधी आणि सर्व नियम मान्य करून पाळावेत; मी परमेश्वर आहे.”


म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम मान्य करून पाळावेत म्हणजे ज्या देशात वसाहत करण्यासाठी मी तुम्हांला घेऊन जात आहे तो तुमचा त्याग करणार नाही.


माझा सेवक मोशे ह्याला सर्व इस्राएलसाठी म्हणून होरेबात मी दिलेले नियमशास्त्र, म्हणजे अर्थात नियम व निर्णय ह्यांचे स्मरण ठेवा.”


तर मंडळीने मारणार्‍याचा आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याचा न्याय ह्या नियमानुसार करावा.


मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशेच्या द्वारे परमेश्वराने जे नियम व विधी इस्राएल लोकांना लावून दिले ते हे होत.


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


तुझा बांधव म्हणजे एखादा इब्री पुरुष किंवा इब्री स्त्री तुला विकण्यात आली असली तर त्याने किंवा तिने सहा वर्षे दास्य केल्यावर सातव्या वर्षी त्याला किंवा तिला मुक्त करून जाऊ दे.


तुम्ही पैलतीरी जाऊन ज्या देशाचे वतन मिळवणार आहात त्यात तुम्ही त्या पाळाव्यात म्हणून परमेश्वराने त्या वेळेस तुम्हांला विधी व नियम शिकवण्याची मला आज्ञा केली.


इस्राएल लोक मिसर देशातून निघाले तेव्हा त्यांना मोशेने सांगितलेले निर्बंध, विधी व नियम हेच;


पाहा, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही जात आहात त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हांला विधी व नियम शिकवले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे.


हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हांला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे?


मोशेने सर्व इस्राएल लोकांना बोलावून सांगितले : “अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम आज मी तुम्हांला ऐकवत आहे ते ऐका; तुम्ही ते शिका आणि काळजीपूर्वक पाळा.


पण तू येथे माझ्याजवळ उभा राहा आणि जी आज्ञा आणि जे विधी व नियम तू त्यांना शिकवावेत, ते सर्व मी तुला सांगेन, म्हणजे जो देश मी त्यांना वतन म्हणून देत आहे तेथे त्यांनी ते पाळावेत.’


तुमचा देव परमेश्वर ह्याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हांला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे ते हे : तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावेत.


भविष्यकाळी तुझा मुलगा जेव्हा तुला विचारील की, ‘हे जे निर्बंध, विधी व नियम पाळण्याची आपला देव परमेश्वर ह्याने तुम्हांला आज्ञा केली आहे त्याचे प्रयोजन काय?’


बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, तुम्ही कसे वागून देवाला संतोषवावे1 हे तुम्ही आमच्यापासून ऐकून घेतलेत व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात; त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan