Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 20:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 माझ्यासाठी एक मातीची वेदी कर आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे कर, जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 माझ्यासाठी मातीची वेदी बांधा आणि तिजवर तुझी मेंढरे व तुझे बैल यांची होमार्पणे व शांत्यर्पणे वाहा; जेथे जेथे मी माझ्या नावाची आठवण व्हावी म्हणून मी सांगतो तेथे तेथे मी येऊन तुम्हास आशीर्वाद देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 “ ‘माझ्यासाठी मातीची वेदी तयार करा व त्यावर तुमची मेंढरे, बोकडे व तुमचे गुरे चढवून आपली होमार्पणे व शांत्यर्पणे ही अर्पण करा. जिथे कुठे माझ्या नावाचे गौरव व्हावा असे मी ठरवेन, तिथे मी तुमच्याजवळ येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 20:24
44 Iomraidhean Croise  

मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील;


परमेश्वराने ओबेद-अदोम ह्याच्या घराण्याला व त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली असे दावीद राजाला कोणी सांगितले; तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद-अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला.


माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटलेस त्या ह्या स्थलाकडे, ह्या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो; जी प्रार्थना तुझा सेवक ह्या स्थानाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक.


तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील त्याप्रमाणे कर; म्हणजे ह्या भूतलावरील सर्व देशांचे लोक तुझे नाम ओळखून तुझ्या इस्राएल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील आणि मी जे हे मंदिर बांधले आहे त्यावर तुझे नाम आहे हे त्यांना कळून येईल.


परमेश्वर त्याला म्हणाला, “तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनवणी मी ऐकली आहे; हे जे मंदिर तू बांधले आहेस त्याला माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे; माझी दृष्टी व माझे चित्त त्यावर सतत राहील.


तेव्हा नामान म्हणाला, “एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला दोन खेचरांच्या ओझ्याची माती द्या; कारण ह्यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय इतर कोणत्याही देवांना होमबली अर्पण करणार नाही की यज्ञही करणार नाही.


ह्या प्रकारे रहबाम राजाने यरुशलेमेत आपली मजबुती करून तेथे राज्य केले; रहबाम राज्य करू लागला तेव्हा तो एकेचाळीस वर्षांचा होता, व परमेश्वराने आपल्या नामाच्या निवासासाठी म्हणून जे यरुशलेम नगर सर्व इस्राएल वंशांतून निवडून घेतले होते तेथे त्याने सतरा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव नामा; ती अम्मोनीण होती.


परंतु यरुशलेम येथे माझे नाव असावे म्हणून मी ते निवडले आहे. माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर मी दाविदाला निवडून नेमले आहे.’


ह्या मंदिरी माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे; माझे नेत्र व माझे मन हे येथे सतत लागलेले राहील.


यरुशलेमेतील देवाच्या ह्या मंदिराचा विध्वंस करावा ह्या उद्देशाने ह्या आज्ञेत जे कोणी खटपटी करतील व जे कोणी राजे किंवा लोक ती फिरवावी म्हणून तीत हात घालतील त्या सर्वांचा निःपात ज्या देवाने तेथे आपल्या नामाचा निवास केला आहे तो करील; मी दारयावेश हा हुकूम करीत आहे त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी.”


पण तुम्ही माझ्याकडे वळलात व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चाललात तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यांना एकत्र करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन.’


मी सुज्ञतेने, सरळ मार्गाने चालेन; तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन.


हे यरुशलेमे, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत.


परमेश्वर सीयोनेतून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो.


आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता परमेश्वर सीयोनेतून तुला आशीर्वाद देवो.


त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली आहे; तुझ्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट करून अगदी धुळीस मिळवले आहे.


शालेमात त्याचा मंडप आहे; व सीयोनेत त्याचे निवासस्थान आहे.


तर यहूदाचा वंश त्याने पसंत केला; आपणाला प्रिय जो सीयोन डोंगर तो त्याने पसंत केला.


मोशे म्हणाला, “आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्यासाठी यज्ञपशू आणि होमबली तू आमच्या हवाली केले पाहिजेत;


मग मोशेचा सासरा इथ्रो ह्याने देवाला होमबली अर्पण केले व यज्ञ केले; आणि अहरोन इस्राएलांच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो ह्याच्याबरोबर देवासमोर भोजन करायला आला.


तू माझ्यासाठी दगडांची वेदी बांधशील तर ती घडलेल्या चिर्‍यांची नसावी, कारण तू आपले हत्यार दगडाला लावल्यास तो तुझ्याकडून अपवित्र होईल.


मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली. अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी त्याने एक वेदी बांधली, आणि इस्राएलाच्या बारा वंशांप्रमाणे बारा स्तंभ उभारले.


त्याने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले, आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांत्यर्पणे अर्पण केली.


बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब व पाच हात रुंद अशी एक वेदी बनव; ती चौरस असावी. तिची उंची तीन हात असावी.


जो आवडीने नीती आचरतो त्याला, जे तुझ्या मार्गाने चालताना तुझे स्मरण करतात, त्यांना तू भेट देतोस; पाहा, तू आमच्यावर कोपलास, कारण आम्ही पापी ठरलो; ह्या स्थितीत आम्ही बहुत काळ आहोत; तर आमचा उद्धार होईल काय?


आणि तो पशू दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करण्यासाठी आणला नाही, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.


कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे, माझ्या नावाप्रीत्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात व निर्दोष बली अर्पण करतात; कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


तेव्हा जे स्थळ तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथेच मी तुम्हांला सांगतो त्या सगळ्या वस्तू आणा : आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करायची अर्पणे आणि तुम्ही परमेश्वराला कराल ते सर्व विशिष्ट नवस.


जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या स्थापनेसाठी निवडील ते तुझ्यापासून फार दूर असले तर जी गुरेढोरे व शेरडेमेंढरे परमेश्वराने तुला दिली असतील त्यांपैकी तुला वाटेल ते माझ्या आज्ञेप्रमाणे मारून आपल्या वेशीच्या आत आपल्या इच्छेस येईल त्याप्रमाणे तू खावेस.


पण तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाची स्थापना करण्यासाठी तुमच्या सर्व वंशांच्या वतनातून जे स्थान निवडून घेईल तेथे त्याच्या निवासस्थानी तुम्ही त्याला शरण जा व तेथेच जात जा;


जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथे आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा दशमांश आणि आपली गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे प्रथमवत्स आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर खा; असे केल्याने तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय निरंतर बाळगण्यास शिकशील;


तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी, आणि तुझ्या गावातला लेवी, आणि तुमच्यामध्ये असलेला उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.


आणि तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथमउत्पन्न तू घरी आणशील, तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या नावाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा.


तो तुझ्यावर प्रेम करील, तुला आशीर्वाद देईल, तुला बहुगुणित करील; जो देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथ वाहिली होती त्या देशात तुझ्या पोटचे फळ आणि तुझ्या भूमीचा उपज म्हणजे धान्य, द्राक्षारस व तेल ह्या बाबतीत आणि तुझ्या गुराढोरांची व शेरडामेंढरांची वाढ ह्या बाबतीत तुला बरकत देईल.


प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan