Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 20:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका. आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 माझ्या खेरीज इतर कोणतेही देव बनवू नका; तुमच्यासाठी चांदीच्या किंवा सोन्याच्या मूर्त्या बनवू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 20:23
21 Iomraidhean Croise  

ते परमेश्वराचे भय धरत खरे, तरी ज्या राष्ट्रांतून त्यांना आणले होते त्यांच्या रीतीप्रमाणे ते आपल्या दैवतांची उपासना करत.


ह्या प्रकारे ही राष्ट्रे इकडे परमेश्वराचे भय धरत व तिकडे कोरीव मूर्तींचीही पूजा करत; त्यांचे पूर्वज करत त्याप्रमाणेच त्यांचे पुत्रपौत्र आजवर करत आहेत.


मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, “हाय! हाय! ह्या लोकांनी घोर पातक केले आहे; ह्यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनवले.


तू आपल्यासाठी ओतीव देव करू नकोस.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे इस्राएल घराण्या, जा, आपल्या हव्या त्या मूर्तीची पूजा कर; पण पुढे तुम्ही खरोखर माझे ऐकाल, आणि आपल्या अर्पणांनी व मूर्तींनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावणार नाही.


त्यांनी आपला उंबरठा माझ्या उंबरठ्याशेजारी, आपले द्वारस्तंभ माझ्या द्वारस्तंभाशेजारी उभारले आणि माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती; अमंगळ कृत्ये करून त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावला म्हणून मी रागाने त्यांचा नाश केला.


तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस;


त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने. रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांपासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले.


तुम्ही मूर्तींकडे वळू नये आणि आपल्यासाठी ओतीव देव करू नयेत; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिलकोम मूर्तीचीही1 शपथ वाहतात,


‘जो परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओतीव मूर्ती कारागिराकडून करवून तिची गुप्तपणे स्थापना करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


त्यांच्या काष्ठपाषाणाच्या व सोन्यारुप्याच्या मूर्ती व इतर अमंगळ वस्तू तुम्ही पाहिल्या;


कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.


त्याने ती अकराशे चांदीची नाणी आपल्या आईला परत केल्यावर ती म्हणाली, “माझ्या मुलाच्या हितासाठी माझे हे पैसे मी परमेश्वराला मनापासून समर्पित केले आहेत. ह्यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती करावी म्हणून हे पैसे मी आता तुला परत करते.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan