Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 20:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये ह्यासाठी देव आला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मग मोशे लोकांस म्हणाला, “भिऊ नका, कारण तुमची परीक्षा करावी आणि त्याचे भय तुमच्या डोळ्यांपुढे राहून तुम्ही पाप करू नये यासाठी देव आला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. तुमची परीक्षा पाहावी म्हणून परमेश्वर आले आहेत, अशासाठी की परमेश्वराचे भय तुम्हाला पापापासून दूर ठेवण्याकरिता तुमच्याबरोबर असावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 20:20
22 Iomraidhean Croise  

तरी त्या संदेष्ट्याचे किंवा त्या स्वप्न पाहणार्‍याचे तुम्ही ऐकू नका; कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रीती करता की नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची ही अशी परीक्षा पाहत आहे.


तू आपल्या दृष्टीने स्वत:स शहाणा समजू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा.


शमुवेल लोकांना म्हणाला, “भिऊ नका, हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा;


तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना; त्याचेच भय व धाक धरा.


दया व सत्य ह्यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात.


तो मानवाला म्हणाला, ‘पाहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय; दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.”’


तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली चाळीस वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण कर.


ह्या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामाला कसोटीस लावले; त्याने ‘अब्राहामा’, अशी हाक मारली, तेव्हा अब्राहाम म्हणाला, “काय आज्ञा?”


तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.


परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ1 होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात.


माझ्या पूर्वीचे अधिपती प्रजेवर बोजा लादत व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षारस घेऊन आणखी चाळीस शेकेल चांदी घेत असत. त्यांचे सेवकदेखील लोकांवर अधिकार गाजवत, पण मी तसे केले नाही, कारण मला देवाचे भय होते.


तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने व खर्‍या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा.


तर आता हे इस्राएला, तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी,


त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्रपौत्र ह्यांनी तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून पाळाव्यात म्हणजे तू दीर्घायू होशील.


ज्या दिवशी तू होरेबाजवळ आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभा राहिलास त्या दिवशी परमेश्वर मला म्हणाला की, ‘ते इहलोकी असेपर्यंत त्यांनी माझे भय बाळगायला शिकावे व आपल्या मुलाबाळांनाही तसे शिकवावे म्हणून ह्या लोकांना माझ्याजवळ जमव म्हणजे मी आपली वचने त्यांना ऐकवीन.’


मग तो बोलला, “तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस; कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, ह्यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले.”


अब्राहाम म्हणाला, “ह्या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करतील असे मला वाटले.


मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा, कारण ज्या मिसरी लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत.


आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे, आपले निरंतरचे कल्याण व्हावे आणि परमेश्वराने आपल्याला आजच्याप्रमाणेच जिवंत राखावे म्हणून त्याने हे सर्व विधी पाळण्याची आपल्याला आज्ञा दिली.


कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, “भिऊ नकोस, मी तुला साहाय्य करतो.”


तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan