Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 20:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी परमेश्वर तुझा देव आहे. ज्याने तुला मिसर देशातून, गुलामगिरीतून सोडवून आणले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले, तो मीच याहवेह, तुमचा परमेश्वर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 20:2
50 Iomraidhean Croise  

हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, “परमेश्वर हाच देव! परमेश्वर हाच देव!”


परमेश्वराने त्यांना “मूर्तीची उपासना करू नका” असे सांगितले असूनही त्यांनी त्यांची उपासना केली.


ह्याचे कारण असे की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने त्यांना मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडवून मिसर देशातून बाहेर आणले होते तरी त्याच्याविरुद्ध त्यांनी पाप केले व अन्य देवांची पूजा केली,


म्हणून त्याचा देव परमेश्वर ह्याने त्याला अरामी लोकांच्या राजाच्या हाती दिले; त्यांनी त्याला जिंकून त्याचे पुष्कळ लोक पाडाव करून दिमिष्कास नेले. ह्याशिवाय त्याला इस्राएलाच्या राजाच्या हाती दिले; त्याने मोठी कत्तल उडवून त्याला जेर केले.


“माझ्या लोकांनो, ऐका, मी बोलत आहे; हे इस्राएला, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो : मी देव, तुझा देव आहे;


मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुला मिसर देशातून बाहेर काढले, तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरीन;


परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही; इस्राएलाने माझे ऐकले नाही.


तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडवले; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले; मरीबाच्या जलांजवळ मी तुला पारखले. (सेला)


पुढील काळी तुझा मुलगा तुला विचारील की हे काय आहे? तेव्हा त्याला सांग, ‘मिसर देशातून, दास्यगृहातून परमेश्वराने आम्हांला आपल्या भुजबलाने बाहेर आणले,


मोशे लोकांना म्हणाला, “ह्या दिवसाची आठवण ठेवा; ह्याच दिवशी तुम्ही मिसरातून, दास्यगृहातून बाहेर निघालात; परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हांला ह्या ठिकाणातून बाहेर आणले म्हणून ह्या दिवशी खमिराची भाकर खायची नाही.


तू आपल्या उद्धरलेल्या लोकांना स्वकरुणेने नेले आहे; आपल्या बलाने तू त्यांना आपल्या पवित्र निवासाकडे घेऊन गेला आहेस.


भीती व दहशत त्यांना घेरतात; तुझ्या बाहुपराक्रमाने ते दगडाप्रमाणे निश्‍चल झाले आहेत; हे परमेश्वरा, तुझे लोक पार जाईपर्यंत, तू खरेदी केलेली प्रजा पार निघून जाईपर्यंत असे होईल.


“तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिसरी लोकांवर जे रोग मी पाठवले त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही; कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे.


आणि देव हे सर्व शब्द बोलला :


त्यांच्यामध्ये राहण्यासाठी ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर काढले तो मी परमेश्वर त्यांचा देव आहे असे त्यांना कळेल; मी त्यांचा देव परमेश्वर आहे.


म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;


कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे; मी तुझ्यासाठी मिसर खंडादाखल दिला आहे, तुझ्याबद्दल कूश व सबा दिले आहेत.


परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्यास्तव असे दिवस येत आहेत की, ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना मिसर देशांतून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे कोणी म्हणणार नाही;


ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्या परमेश्वराने आम्हांला मिसर देशातून आणले, आम्हांला रानातून वैराण व खाच-खळग्यांच्या प्रदेशातून, निर्जल देशातून व मृत्युच्छायेतून नेले, ज्या प्रदेशातून कोणी जातयेत नाही व जेथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हांला नेले, तो परमेश्वर कोठे आहे?’


परमेश्वर म्हणतो, “त्या काळी मी इस्राएलाच्या सर्व वंशांचा देव होईन व ते माझे लोक होतील.”


तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा : मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृत्पटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.


“परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो तुमचे पूर्वज मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले तेव्हा मी त्यांच्याबरोबर करार केला की,


मी परमेश्वर तुमचा देव आहे; माझ्या नियमांना अनुसरून चाला, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे वागा;


त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या दिवशी मी इस्राएलास निवडून घेतले, याकोब वंशाकडे मी हात उचलून शपथ वाहिली, मिसर देशात त्यांना मी प्रकट झालो, हात उचलून त्यांना शपथपूर्वक म्हणालो की, मी परमेश्वर तुमचा देव आहे.


तेव्हा मी त्यांना म्हटले, तुम्ही सर्वांनी आपल्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू फेकून द्याव्यात व मिसर देशाच्या मूर्तींनी आपणांस विटाळ होऊ देऊ नये; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


मी संदेष्ट्यांबरोबर बोललो आहे; मीच दिव्यदर्शनांची रेलचेल केली आहे आणि संदेष्ट्यांच्या द्वारे मी दृष्टान्त देऊन बोध केला आहे.


मिसर देशापासून मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्यावाचून अन्य देव तुला ठाऊक नाही, माझ्यावाचून कोणी त्राता नाही.


कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे; मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा.”


तुमच्याजवळ खरी तागडी, खरी वजने, खरा एफा2 व खरा हिन2 असावा; ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले तो मी परमेश्वर तुमचा देव आहे;


म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की, मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले तेव्हा मांडवात त्यांना राहायला लावले; मी परमेश्वर तुमचा देव आहे.” ह्याप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांना नेमलेले समय कळवले.


मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्हांला कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे ह्या हेतूने मी तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.


कारण मिसर देशातून मी बाहेर काढलेले हे माझे दास होत. दासांप्रमाणे त्यांची विक्री करायची नाही.


कारण इस्राएल लोक माझेच दास आहेत; मिसर देशातून काढलेले हे माझे दास आहेत; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


तुम्ही आपल्यासाठी मूर्ती करू नयेत; त्याचप्रमाणे कोरीव मूर्ती अथवा स्तंभ उभारू नयेत अथवा आकृती कोरलेला पाषाण पुजण्यासाठी आपल्या देशात स्थापन करू नये, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.


मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्ही मिसर्‍यांचे दास राहू नये म्हणूनच मी तुम्हांला मिसर देशातून काढून बाहेर आणले; मी तुमची जोखडे मोडून तुम्हांला ताठ मानेने चालवले आहे.


मी तुम्हांला अमोरी लोकांच्या देशाचे वतन देण्यास मिसर देशातून आणले व चाळीस वर्षे रानातून फिरवले.


यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही; कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्याइतका तो संपन्न आहे.


किंवा देव केवळ यहूद्यांचा आहे काय? तो परराष्ट्रीयांचाही नव्हे काय? हो, आहे.


मरेपर्यंत त्याला दगडमार करावा; कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिसर देशातून म्हणजे दास्यगृहातून काढून आणले त्याच्यापासून तुला बहकवण्याचा त्याने प्रयत्न केला आहे.


तूही मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मुक्त केले ह्याचे स्मरण ठेव; म्हणून ही आज्ञा मी आज तुला देत आहे.


तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिऊ नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून आणले तो तुझ्याबरोबर आहे.


तू मिसर देशात दास होतास आणि तेथून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला पराक्रमी बाहूंनी व उगारलेल्या हाताने बाहेर आणले ह्याची आठवण ठेव; म्हणूनच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे.


‘ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


पण परमेश्वराने तुम्हांला पराक्रमी हाताने दास्यगृहातून मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडवून बाहेर आणले, ह्याचे कारण हेच की, तुमच्यावर त्याचे प्रेम आहे, आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे.


परमेश्वराचा दूत गिलगालाहून बोखीम येथे येऊन लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला मिसर देशातून काढून तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही;


आणि मी तुम्हांला म्हणालो की, मीच तुमचा देव परमेश्वर आहे; ज्या अमोर्‍यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांना भिऊ नका; पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan