Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 20:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहेत, कर्ण्याचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले तेव्हा त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला, शिंगाचा नाद होत आहे व पर्वतातून धूर वर चढताना पाहून भीतीने त्यांचा थरकाप झाला. ते दूर उभे राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जेव्हा लोकांनी विजा पाहिल्या आणि गडगडाट व तुतारीचा आवाज ऐकला आणि धुराने भरलेला पर्वत पाहिला, ते भीतीने कंपित झाले व दूर उभे राहिले

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 20:18
13 Iomraidhean Croise  

नंतर सूर्य मावळला आणि निबिड अंधकार पडला, तेव्हा असे झाले की धुमसती आगटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यांमधून जाताना दिसली.


तो म्हणाला, “मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो.”


तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडवले; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले; मरीबाच्या जलांजवळ मी तुला पारखले. (सेला)


परमेश्वर म्हणतो, मी जवळचा मात्र देव आहे आणि दूरचा देव नव्हे काय?


होरेब डोंगराजवळ मंडळी जमली होती त्या दिवशी आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे तू विनंती केली होतीस त्याप्रमाणे होईल; तू म्हणालास, ‘माझा देव परमेश्वर ह्याची वाणी पुन्हा माझ्या कानी न पडो, मोठा अग्नी पुन्हा माझ्या दृष्टीस न पडो, पडला तर मी मरेन.’


तुला शिक्षण द्यावे म्हणून आकाशातून त्याने आपली वाणी तुला ऐकवली आणि पृथ्वीवर त्याने तुला आपला महाअग्नी दाखवला आणि अग्नीमधून निघालेले त्याचे शब्द तू ऐकलेस.


पर्वत अग्नीने जळत असता काळोखातून निघत असलेला त्याचा शब्द तुम्ही ऐकला तेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या वंशांचे सर्व प्रमुख व तुमचे वडील जन माझ्याजवळ आले;


तर आता आम्ही प्राणाला का मुकावे? कारण हा प्रचंड अग्नी आम्हांला भस्म करील, आम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी आणखी ऐकत राहू तर मरून जाऊ.


म्हणून तू जवळ जा आणि आपला देव परमेश्वर जे काही बोलेल ते ऐकून घे; आणि मग आपला देव परमेश्वर तुला जे काही सांगेल ते आम्हांला सांग म्हणजे आम्ही ते ऐकून त्याप्रमाणे वागू.’


त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही पर्वतावर चढला नाहीत, परमेश्वराचे वचन तुम्हांला प्रकट करावे म्हणून त्या प्रसंगी मी परमेश्वराच्या व तुमच्यामध्ये उभा राहिलो; तेव्हा तो म्हणाला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan