मनश्शेने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करून यहूदाला पाप करायला लावले, एवढेच नव्हे तर त्याने निर्दोषी जनांचा मनस्वी संहार केला, एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत यरुशलेम रक्तमय केले.
ह्याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा ह्याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्राचा वध केला. त्याच्या मृत्युसमयी तो म्हणाला, “परमेश्वरा, हे अवलोकन करून ह्याचे उसने फेड.”
तथापि त्या बैलाला आधीचीच हुंदडण्याची सवय असेल आणि त्याच्या धन्याला त्याबद्दल सूचना केली असूनही त्याने त्याला आवरले नाही, आणि मग त्या बैलाने कोणा पुरुषाला किंवा स्त्रीला मारून टाकले, तर त्याला दगडमार करावा आणि त्याच्या धन्यालाही जिवे मारावे.
कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाशांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्त पृथ्वी प्रकट करील, वधलेल्यांना ती ह्यापुढे झाकून ठेवणार नाही.
एवढे मात्र पक्के समजा की, तुम्ही मला जिवे माराल तर तुम्ही आपणांवर, ह्या नगरावर व ह्यातील रहिवाशांवर निर्दोष रक्त पाडल्याचा दोष आणाल; कारण वास्तविक ही सर्व वचने तुमच्या कानी पडावीत म्हणून परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे.”
ते जिवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर1 लोक एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस घातकी आहे; हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देत नाही.”
कारण “व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, लोभ धरू नकोस,” ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, “जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” ह्या वचनात आहे.
हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणार्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.
आणि हेही ठाऊक आहे की, नियमशास्त्र नीतिमानांसाठी केलेले नाही, तर अधर्मी व अनावर, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगळ, बापाला ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे,
कारण “व्यभिचार करू नकोस” असे ज्याने सांगितले, त्यानेच, “खून करू नकोस,” हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास, तर नियमशास्त्र उल्लंघणारा झाला आहेस.