Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 2:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 म्हणून देवाने इस्राएलवंशजांकडे दृष्टी लावली; देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 देवाने इस्राएली लोकांस पाहिले आणि त्यास त्यांची परिस्थिती समजली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 परमेश्वराने इस्राएली लोकांना पाहिले आणि त्यांना त्यांची आस्था वाटली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 2:25
16 Iomraidhean Croise  

मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहील आणि ह्या शिव्याशापाऐवजी मला चांगला मोबदला देईल.”


तो गाणी गाऊन लोकांना म्हणतो, ‘मी पाप केले होते; मी सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने चाललो होतो, त्याचे प्रायश्‍चित्त मला मिळाले नाही;


कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.


तू हे पाहिलेच आहे, उपद्रव व दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस; लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; पोरक्यांचा साहाय्यकर्ता तू आहेस.


तू मला वैर्‍याच्या कोंडीत सापडू दिले नाहीस; माझे पाय तू प्रशस्त स्थळी स्थिर केलेस.


तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही.


पुढे योसेफाची ज्याला माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला.


परमेश्वराने इस्राएलांसाठी फारोचे व मिसरी लोकांचे काय केले, वाटेने आपल्याला काय काय त्रास भोगावा लागला, आणि परमेश्वराने आपली सोडवणूक कशी केली ही सर्व हकिकत मोशेने आपल्या सासर्‍याला कळवली.


पाहा, इस्राएलवंशजांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे; मिसरी लोक त्यांच्यावर कसा जाचजुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे.


तेव्हा लोकांना विश्वास वाटला; परमेश्वराने इस्राएलवंशजांची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली.


तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणार्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा.’


ती म्हणत असे की, “लोकांत माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्यासाठी त्याने असे केले.”


मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’


पण आम्ही आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धावा केला तेव्हा त्याने आमची आरोळी ऐकली; आणि आमचे दु:ख, कष्ट व छळ पाहिला.


ती म्हणाली, “हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस,आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन; आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही;” असा तिने नवस केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan