निर्गम 2:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तो त्याला म्हणाला, “तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू त्या मिसर्यास जिवे मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय?” तेव्हा मोशेला भीती वाटली; तो म्हणाला, “खरोखर ती गोष्ट फुटली.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पण त्या मनुष्याने उत्तर दिले, “तुला आम्हांवर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू काल जसे त्या मिसऱ्यास जिवे मारलेस, तसे मला मारायला पाहतोस का?” तेव्हा मोशे घाबरला. तो विचार करीत स्वत:शीच म्हणाला, “मी काय केले ते आता खचीत सर्वांना माहीत झाले आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तो मनुष्य त्याला म्हणाला, “तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश असे कोणी नेमले? तू इजिप्त देशाच्या मनुष्याला जसे मारून टाकलेस, तसे मलाही मारून टाकायचा तुझा विचार आहे काय?” तेव्हा मोशे घाबरला आणि त्याला वाटले, “मी जे काही केले ते सर्वांना माहीत झाले असणार.” Faic an caibideil |