Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 19:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 परमेश्वराने सीनाय पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलावले, तेव्हा तो वर गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 परमेश्वराने पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला सीनाय पर्वताच्या शिखरावर बोलावले. तेव्हा तो पर्वतावर गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 याहवेह सीनाय पर्वतावर उतरले व मोशेला पर्वतावर बोलाविले. मग मोशे वर गेला,

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 19:20
12 Iomraidhean Croise  

त्याने त्याला म्हटले, “तू येथून बाहेर निघून जा; पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा.” तेव्हा पाहा, परमेश्वर जवळून जात असताना त्याच्यासमोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारत व खडक फोडत होता; पण त्या वार्‍यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला; पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता.


तू सीनाय पर्वतावर उतरून त्यांच्याशी स्वर्गातून बोललास आणि त्यांना योग्य निर्णय, खरे कायदे, चांगले नियम व आज्ञा लावून दिल्या;


तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडवले; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले; मरीबाच्या जलांजवळ मी तुला पारखले. (सेला)


तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसर्‍या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल.


तेव्हा मोशे देवाकडे वर गेला; आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की, “याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्राएल लोकांना हे विदित कर.


मोशे पर्वतावर गेल्यावर मेघाने पर्वत झाकून टाकला.


मोशे मेघात प्रवेश करून पर्वतावर चढला; मोशे पर्वतावर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता.


तू पहाटेस तयार हो आणि सकाळी सीनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वतशिखरावर माझ्यासमोर हजर हो.


तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सीनाय पर्वतावर चढून गेला.


तो म्हणाला, “परमेश्वर सीनायहून आला, सेईरावरून आमच्यावर1 उदय पावला; पारान पर्वतावरून तो प्रकटला, लक्षावधी पवित्रांच्या मधून तो आला, त्याच्या उजव्या हातापासून अग्निज्वाला निघाली.


दगडी पाट्या म्हणजे परमेश्वराने तुमच्याशी केलेल्या कराराच्या पाट्या घेण्यासाठी मी पर्वतावर चढून गेलो, तेव्हा मी तेथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिलो; त्या अवधीत मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीही प्यालो नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan