Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 19:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला, तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तिसरा दिवस उजडताच मेघगर्जना झाली व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग आले आणि प्रचंड शिंगाचा फार आवाज होऊ लागला. तेव्हा छावणीत राहणारे सर्व लोक थरथर कापू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तिसर्‍या दिवसाच्या सकाळी ढगांचा गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या व पर्वतावर दाट ढग जमा झाले आणि तुतारीचा फार मोठा नाद झाला. छावणीतील सर्वजण भीतीने कापू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 19:16
31 Iomraidhean Croise  

तो आकाश लववून खाली उतरला; त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता.


त्या मेघामुळे याजकांना सेवाचाकरी करण्यास उभे राहवेना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरून गेले.


पर्जन्याचा लोट खाली यावा म्हणून पाट कोण फोडतो? गर्जणार्‍या विद्युल्लतेला मार्ग कोणी करून दिला?


आमचा देव येत आहे, तो उगा राहायचा नाही; त्याच्यापुढे अग्नी ग्रासत चालला आहे. त्याच्याभोवती मोठे वादळ सुटले आहे.


तुझ्या गर्जनेचा शब्द झंझावातात होता; विजांचा पृथ्वीवर लखलखाट झाला; भूमी कंपित होऊन डळमळली.


अहो माझ्या लोकांनो, ऐका, मी तुम्हांला बोध करतो; हे इस्राएला, तू माझे ऐकशील तर बरे होईल!


त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले; ते पाहून पृथ्वी कंपायमान झाली.


तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसर्‍या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल.


त्याने लोकांना सांगितले की, तिसरा दिवस येईपर्यंत तयार असा, स्त्रीस्पर्श करू नका.


मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले, आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो ते ह्या हेतूने की, मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवावा.” मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले.


मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहेत, कर्ण्याचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले तेव्हा त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले,


लोक दूर उभे राहिले, पण देव निबिड अंधकारात होता, तिकडे मोशे गेला.


मग दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.


मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली तेव्हा परमेश्वराने मेघगर्जना व गारांची वृष्टी केली, आणि अग्नीचा लोळ जमिनीकडे येऊ लागला; ह्या प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर गारांचा वर्षाव केला.


परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे भय धरणार नाही काय? माझ्यापुढे थरथर कापणार नाही काय? मी तर समुद्राला वाळू ही सीमा नेमली आहे; ही सर्वकाळची मर्यादा त्याच्याने उल्लंघवत नाही; त्याच्या लाटा उचंबळतात तरी त्यांचे काही चालत नाही; त्या गर्जना करतात तरी त्यांना ती उल्लंघवत नाही.


परमेश्वर मंदक्रोध व महापराक्रमी आहे; तरी तो पाप्यांना शासन केल्यावाचून राहणार नाही; परमेश्वर वादळात व तुफानात चालतो, मेघ त्याच्या चरणांची धूळ आहेत.


‘कर्ण्याच्या महानादाबरोबर’ तो आपल्या दूतांना पाठवील, आणि ‘ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्‍या सीमेपर्यंत’ त्याच्या निवडलेल्यांना ‘चार्‍ही दिशांकडून जमा करतील.’


त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही पर्वतावर चढला नाहीत, परमेश्वराचे वचन तुम्हांला प्रकट करावे म्हणून त्या प्रसंगी मी परमेश्वराच्या व तुमच्यामध्ये उभा राहिलो; तेव्हा तो म्हणाला,


आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “‘मी अति भयभीत’ व कंपित ‘झालो आहे.”’


प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्यामागे कर्ण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली.


तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले, ‘त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश’ दृष्टीस पडला आणि ‘विजा’ चमकल्या, ‘गर्जना’ व मेघांचे गडगडाट झाले, भूमिकंप झाला व ‘मोठ्या गारांची वृष्टीही’ झाली.


ह्यानंतर मी पाहिले तो पाहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणार्‍या ‘कर्ण्याच्या’ ध्वनीसारखी होती; ती म्हणाली, “इकडे ‘वर ये’ म्हणजे ‘ज्या गोष्टी’ ह्यानंतर ‘घडून आल्या पाहिजेत’ त्या मी तुला दाखवीन.”


राजासनाच्या आतून ‘विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या’ आणि पेटलेल्या सात मशाली राजासनापुडे जळत होत्या; त्या देवाचे सात आत्मे आहेत.


तेव्हा देवदूताने ‘धुपाटणे’ घेऊन त्यात ‘वेदीवरचा अग्नी भरून’ पृथ्वीवर टाकला आणि ‘मेघांचा गडगडाट व गर्जना’ झाल्या, ‘विजा’ चमकल्या व भूमिकंप झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan