Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 19:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्याला कोणी हात लावू नये, लावला तर त्याला दगडमार करावा किंवा बाणांनी विंधावे; मग तो जनावर असो किंवा माणूस असो, त्याला जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घनाद होईल तेव्हा लोकांनी पर्वतावर चढावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 कोणीही त्यास हात लावू नये. हात लावला तर त्यास दगडमार करावी किंवा बाणांनी विंधावे, तो पशू असो किंवा मनुष्य असो, त्यास जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घ आवाज होईल तेव्हा लोकांनी पर्वताजवळ यावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी किंवा धनुष्यबाणाने मारावे; कोणीही त्यांना स्पर्श करू नये. ते मनुष्य असो वा प्राणी, त्यांना जिवंत राहू देऊ नये. जेव्हा एडक्याच्या शिंगाचा दीर्घ नाद कानी पडेल तेव्हाच त्यांनी पर्वताजवळ यावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 19:13
11 Iomraidhean Croise  

मग मोशे पर्वतावरून उतरून लोकांकडे आला; त्याने लोकांना पवित्र केले आणि त्यांनी आपले कपडे धुतले.


तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला, तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले.


मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले, आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले.


शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला, तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने1 उत्तर देत गेला.


तुझ्याबरोबर कोणीही वर चढून येऊ नये, सगळ्या पर्वतावर कोणी मनुष्य दिसता कामा नये, तसेच शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांना त्या पर्वताच्या कडेला चरू देऊ नये.”


क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ.


कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील.


कारण “पशूदेखील पर्वताला शिवला तर त्याला धोंड्यांनी मारावे,” अशी जी आज्ञा ती त्यांना असह्य झाली.


दबा धरणार्‍यांनी त्वरा करून गिब्यावर छापा घातला आणि पुढे सरसावून सर्व नगराचा तलवारीने नाश केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan