Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 18:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परमेश्वराने इस्राएलांसाठी फारोचे व मिसरी लोकांचे काय केले, वाटेने आपल्याला काय काय त्रास भोगावा लागला, आणि परमेश्वराने आपली सोडवणूक कशी केली ही सर्व हकिकत मोशेने आपल्या सासर्‍याला कळवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परमेश्वराने इस्राएली लोकांसाठी फारोचे व मिसरी लोकांचे काय केले, तसेच मिसराहून प्रवास करताना काय काय संकटे आली व कसा त्रास झाला परमेश्वराने त्यांना कसे वाचवले ती सर्व हकिकत मोशेने आपल्या सासऱ्याला सांगितली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मोशेने आपल्या सासर्‍याला सर्वकाही सांगितले जे इस्राएली लोकांसाठी याहवेहने फारोह व इजिप्तच्या लोकांबरोबर केले आणि वाटेत ज्या अडचणी त्यांना आल्या आणि कशाप्रकारे याहवेहने त्यांची सुटका केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 18:8
23 Iomraidhean Croise  

कारण हा मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी आपल्या बापाकडे कसा जाऊ? माझ्या बापाला दु:ख होईल ते मला पाहवणार नाही.”


तर आता हे आमच्या देवा, हे थोर, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणार्‍या देवा, अश्शूरी राजाच्या काळापासून आजपर्यंत आम्हांला, आमच्या राजांना, आमच्या अधिपतींना, आमच्या याजकांना, आमच्या संदेष्ट्यांना, आमच्या वाडवडिलांना आणि तुझ्या सर्व लोकांना जे कष्ट झाले आहेत ते क्षुल्लक लेखू नकोस.


त्याने त्यांना त्यांचा द्वेष करणार्‍याच्या हातून सोडवले. शत्रूच्या हातून त्यांना मुक्त केले.


तरी आपला पराक्रम विदित करावा म्हणून, त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले.


परमेश्वराने उद्धरलेले जन असे म्हणोत कारण त्यांना त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे,


अहो देवाचे भय धरणारे सर्व जनहो, तुम्ही या, ऐका; त्याने माझ्या जिवासाठी जे केले आहे ते मी सांगतो.


तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडवले; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले; मरीबाच्या जलांजवळ मी तुला पारखले. (सेला)


भीती व दहशत त्यांना घेरतात; तुझ्या बाहुपराक्रमाने ते दगडाप्रमाणे निश्‍चल झाले आहेत; हे परमेश्वरा, तुझे लोक पार जाईपर्यंत, तू खरेदी केलेली प्रजा पार निघून जाईपर्यंत असे होईल.


हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे; हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकतो.


इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो तेव्हा आम्हांला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते; पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हांला ह्या रानात आणले आहे.”


देवाने मोशे व आपली प्रजा इस्राएल ह्यांच्यासाठी काय काय केले, परमेश्वराने इस्राएलास मिसर देशातून कसे बाहेर आणले हे मोशेचा सासरा मिद्यानाचा याजक इथ्रो ह्याने ऐकले.


म्हणून देवाने इस्राएलवंशजांकडे दृष्टी लावली; देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवले.


जेव्हा माझा दूत तुझ्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी ह्या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा संहार करीन,


मी तुला सांगितले की, “माझ्या पुत्राला माझी सेवा करण्यास जाऊ दे”; पण तू त्याला जाऊ देण्याचे नाकारले, तर पाहा, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जिवे मारीन.”’


तरी फारो तुमचे काही ऐकणार नाही. मग मी मिसरावर आपला हात टाकीन आणि त्यांना मोठ्या शिक्षा करून मी माझ्या सेना, माझे लोक, इस्राएलवंशज ह्यांना मिसर देशातून बाहेर काढीन.


आणि मिसरावर मी आपला हात उभारून त्यांच्यामधून इस्राएल लोकांना बाहेर काढीन तेव्हा मिसर्‍यांना कळेल की, मी परमेश्वर आहे.”


नंतर मोशेने कादेशाहून अदोमाच्या राजाकडे जासुदांच्या हाती असा निरोप पाठवला, “तुझा भाऊ इस्राएल म्हणतो की, आमच्यावर जे क्लेश ओढवले ते तुला ठाऊकच आहेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan