Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 18:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आणि दुसर्‍याचे नाव अलियेजर होते; कारण तो म्हणाला होता, “माझ्या पित्याच्या देवाने माझे साहाय्य करून मला फारोच्या तलवारीपासून वाचवले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 दुसऱ्या मुलाचे नाव एलियेजर असे होते, कारण तो जन्मला तेव्हा मोशे म्हणाला होता, “माझ्या पित्याच्या देवाने मला मदत केली व मला फारोच्या तलवारीपासून वाचवले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 दुसर्‍या मुलाचे नाव एलिएजर असे ठेवले होते. कारण मोशे म्हणाला, “माझ्या वडिलांचे परमेश्वर माझे साहाय्य झाले; व त्यांनी मला फारोहच्या तलवारीपासून सोडविले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 18:4
19 Iomraidhean Croise  

तुझे साहाय्य करणारा तुझ्या पित्याचा देव, तुला वरदान देणारा सर्वसमर्थ देव ह्याच्याकडून हे होईल. वरून आकाशाची व खालून जलाशयाची वरदाने तो तुला देईल, अंगावर पिणार्‍यांची व पोटच्या फळांची वरदाने तो तुला देईल.


मोशेचे पुत्र गेर्षोम व अलियेजर.


आणि अलियेजराच्या पुत्रांमध्ये रहब्या मुख्य; अलियेजराला दुसरे पुत्र झाले नाहीत, परंतु रहब्याचे पुत्र बहुत होते.


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.


तोच मला माझ्या वैर्‍यांपासून सोडवतो, माझ्याविरुद्ध उठणार्‍यांवर तू माझे वर्चस्व करतोस, जुलमी मनुष्यांपासून मला सोडवतोस.


मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले.


देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.


फारो त्याला म्हणाला, “माझ्यापुढून चालता हो आणि सांभाळ, पुन्हा मला आपले तोंड दाखवू नकोस. तू आपले तोंड मला दाखवशील, त्या दिवशी तू मरशील.”


फारोच्या कानी ती गोष्ट गेली तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजले; पण मोशे फारोपुढून पळून मिद्यान देशात जाऊन पोहचला आणि तेथे एका विहिरीजवळ बसला.


तिला मुलगा झाला, त्याने त्याचे नाव गेर्षोम ठेवले; तो म्हणाला, “कारण मी परदेशात उपरा आहे.”


मग मोशे आपली बायको व मुलगे ह्यांना गाढवावर बसवून मिसर देशास परत जायला निघाला. तो देवाची काठी आपल्या हातात घेऊन चालला.


माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काहीएक उपद्रव केला नाही; कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो; व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.”


मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला खरोखर कळले की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”


हे शब्द ऐकताच मोशे परत गेला आणि मिद्यान देशात उपरा झाला; तेथे त्याला दोन मुलगे झाले.


तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि त्याने मला ‘सिंहाच्या जबड्यातून’ मुक्त केले.


अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली.


म्हणून आपण धैर्याने म्हणतो2 “प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan