Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 18:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 ते प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करीत; कठीण प्रकरणे मोशेकडे आणत, पण लहानसहान प्रकरणांचा निकाल ते स्वतः करत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 ते लोकांवर न्यायाधीश झाले. लोक सतत नायकांकडे आपली गाऱ्हाणी आणू लागले व मोशेला फार महत्वाच्या प्रकरणांबद्दलच निकाल देण्याचे काम करावे लागे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून सेवा केली. अवघड वाद त्यांनी मोशेकडे आणले, परंतु साधेसरळ वाद त्यांनीच सोडविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 18:26
8 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या नामासंबंधाने शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी कूट प्रश्‍नांनी त्याची परीक्षा पाहायला आली.


मी लाचारांचा पिता असे; अपरिचितांच्या फिर्यादीची मी दाद घेई.


त्यांनी प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करावा; त्यांनी सर्व मोठी प्रकरणे तुझ्याकडे आणावीत आणि लहानसहान प्रकरणांचा त्यांनीच निकाल करावा. अशाने तुझे काम हलके होईल व ते तुझ्या भाराचे वाटेकरी होतील.


तो इस्राएल स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नावाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला तेव्हा त्याला मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीथ असे असून ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती.


न्याय करताना पक्षपात करू नका, लहानमोठ्यांचे सारखेच ऐकून घ्या; कोणाचे तोंड पाहून भिऊ नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे; एखादे प्रकरण तुम्हांला विशेष अवघड वाटले, तर ते माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी ते ऐकेन.’


तुझ्या गावात रक्तपात किंवा मारहाण ह्या बाबतीत वाद उपस्थित होऊन त्याचा निर्णय करणे तुझ्या आवाक्याबाहेर असले तर लगेच तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानी जा,


Lean sinn:

Sanasan


Sanasan