Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 18:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 त्याने सर्व इस्राएलांतून कर्तबगार पुरुष निवडून त्यांना प्रमुख नेमले म्हणजेच त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक नेमून ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मोशेने इस्राएल लोकांतून चांगले लोक निवडले आणि त्यांना हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास व दहा दहांवर नायक म्हणून नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 मोशेने संपूर्ण इस्राएलातून सक्षम अशी माणसे निवडली व त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 18:25
9 Iomraidhean Croise  

मिसर देश तुझ्यापुढे खुला आहे; ह्या देशातल्या उत्तम भागात आपल्या बापाला व भावांना वस्ती करू दे; त्यांना गोशेन प्रांतात राहू दे; त्यांच्यापैकी जी कोणी हुशार माणसे तुला ठाऊक असतील त्यांना माझ्या गुराख्यांचे नायक कर.”


दाविदाने दाने आपल्याबरोबरच्या लोकांची मोजदाद केली व त्यांच्यावर सहस्रपती व शतपती नेमले.


तसेच तू ह्या सर्व लोकांतून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून घे आणि लोकांवर अधिकार चालवण्यासाठी त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक म्हणून नेमून ठेव;


मोशेने आपल्या सासर्‍याचे ऐकून त्याच्या सांगण्याप्रमाणे सर्वकाही केले.


मंडळीतून जे पुरुष निवडले ते हे; ते आपापल्या पूर्वजांच्या वंशाचे सरदार असून इस्राएलाच्या हजार-हजारांच्या पथकांचे1 प्रमुख होते.


प्रत्येक वंशातला एकेक पुरुष म्हणजे जो आपल्या पूर्वजांच्या घराण्यातला प्रमुख असेल त्याला आपल्याबरोबर घ्या.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझ्या माहितीतले इस्राएल लोकांचे जे वडील व अंमलदार आहेत त्यांच्यातून सत्तर जण निवडून त्यांना दर्शनमंडपाजवळ माझ्याकडे घेऊन ये. तेथे त्यांनी तुझ्याबरोबर उभे राहावे.


ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली; आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना व यहूदीयमतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली.


म्हणून तुमच्या वंशांपैकी बुद्धिमान व अनुभवी अशा मुख्य पुरुषांना मी तुमचे प्रमुख नेमले, म्हणजे तुमच्या वंशावंशांप्रमाणे हजारा-हजारांवर, शंभरा-शंभरांवर, पन्नासा-पन्नासांवर व दहा-दहांवर नायक व अंमलदार नेमून दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan