Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 18:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मोशे लोकांसाठी काय काय करीत आहे हे त्याच्या सासर्‍याने पाहिले तेव्हा तो म्हणाला, “तू लोकांसाठी हे काय करीत आहेस? तू एकटाच बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्याभोवती उभे राहतात ते का?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मोशे लोकांसाठी काय काय करतो ते इथ्रोने पाहिले तेव्हा तो म्हणाला, “तू लोकांबरोबर जे हे करतोस ते काय आहे? तू एकटाच न्यायनिवाडा करण्यासाठी बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्याभोवती उभे राहतात ते का?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जेव्हा मोशे लोकांसाठी जे सर्व करीत होता ते त्याच्या सासर्‍याने पाहिले, तो म्हणाला, “हे तू लोकांसाठी काय करीत आहेस? तू एकटाच न्यायाधीश म्हणून का बसतोस व ते सर्व लोक दिवसभर तुझ्याभोवती उभे असतात?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 18:14
6 Iomraidhean Croise  

अबशालोम नित्य पहाटेस उठून वेशीकडे जाणार्‍या रस्त्यात उभा राही आणि कोणी फिर्यादी दाद मागण्यासाठी राजाकडे आला म्हणजे त्याला बोलावून “तू कोणत्या नगराचा आहेस,” असे विचारी; तेव्हा तो म्हणे, “तुझा दास इस्राएलाच्या अमुक अमुक वंशातला आहे.”


दुसर्‍या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करायला बसला; आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेभोवती उभे होते.


मोशे आपल्या सासर्‍याला म्हणाला, “लोक देवाला विचारायला माझ्याकडे येतात;


ते प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करीत; कठीण प्रकरणे मोशेकडे आणत, पण लहानसहान प्रकरणांचा निकाल ते स्वतः करत.


त्यांनी त्याला अटकेत ठेवले, कारण त्याचे काय करावे ह्याविषयी काही स्पष्ट केलेले नव्हते.


मोशेचा सासरा2 केनी ह्याचे वंशज यहूदाच्या वंशजांसहित खजुरीच्या नगराहून यहूदाच्या रानात गेले; हे रान अरादाजवळील नेगेबात आहे; तेथे जाऊन ते त्या लोकांबरोबर राहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan