Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 18:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आता मला कळून आले की, सर्व देवांहून परमेश्वर श्रेष्ठ आहे. ज्या बाबतीत मिसर्‍यांनी इस्राएलाशी ताठ्याने वर्तन केले त्या बाबतीतही तो श्रेष्ठ ठरला.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परमेश्वर सर्व देवांहून श्रेष्ठ आहे हे आता मला कळले. इस्राएल लोकांपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानत असलेल्या मिसरी लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आता मला समजले की, याहवेह सर्व दैवतांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ज्यांनी इस्राएली लोकांना क्रूरतेने वागविले होते त्यांचा त्यांनी नाश केला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 18:11
30 Iomraidhean Croise  

ती स्त्री एलीयाला म्हणाली, “आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले.”


नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, “अखिल पृथ्वीत इस्राएलाबाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे; तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा.”


कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व दैवतांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे.


जे मंदिर मी बांधत आहे ते मोठे होणार, कारण आमचा देव सर्व दैवतांहून मोठा आहे.


फारो, त्याचे सेवक, त्याच्या देशाचे सर्व लोक ह्यांना चिन्हे व अद्भुत कृत्ये तू दाखवलीस; कारण ते त्यांच्याशी गर्वाने वागत होते हे तुला ठाऊक होते; तू आपल्या नामाचा महिमा प्रकट केला; तो आजवर आहे.


तथापि त्यांनी व आमच्या पूर्वजांनी उन्मत्त होऊन आपली मान ताठ केली व तुझ्या आज्ञांचा अवमान केला;


त्यांना पुन्हा नियमशास्त्राप्रत आणावे म्हणून तू त्यांना बजावून सांगितले तरी त्यांनी उन्मत्त होऊन तुझ्या आज्ञांचा अवमान केला आणि जे निर्णय पाळल्याने मनुष्य जिवंत राहतो ते न जुमानता त्यांनी पाप केले; त्यांनी आपला खांदा जुवाखालून काढून घेतला, मान ताठ केली व ते ऐकतनासे झाले.


गर्विष्ठांना तू धमकावतोस, तुझ्या आज्ञांपासून बहकणारे शापित आहेत.


परमेश्वर थोर आहे; आमचा प्रभू सर्व देवांपेक्षा थोर आहे हे मी जाणतो.


अहो परमेश्वराचे सर्व भक्तहो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा; परमेश्वर विश्वास ठेवणार्‍यांचे रक्षण करतो; गर्विष्ठांचे पुरेपूर पारिपत्य करतो.


कारण परमेश्वर थोर देव आहे; सर्व देवांहून तो थोर राजा आहे.


कारण हे परमेश्वरा, तू सर्व पृथ्वीहून अत्युच्च आहेस. सर्व देवांहून तू परमथोर आहेस.


तर चला, आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागू या; नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व ह्या देशातून निघून जातील.”


“तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असता, प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पाहा, आणि मुलगा असला तर त्याला जिवे मारा; पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा.”


तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा केली की, “जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा.”


मग मोशे आणि अहरोन फारोकडे आत जाऊन त्याला म्हणाले, “इब्री लोकांचा देव परमेश्वर असे म्हणतो, ‘तू माझ्यासमोर नमायला कोठवर नाकारशील? माझ्या लोकांना माझी सेवा करायला जाऊ दे.


कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशू ह्या सर्वांचे प्रथमजन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन; मी परमेश्वर आहे.


फारो, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्या (पराभवा) कडून माझे गौरव झाल्याने मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.”


परमेश्वराने मिसराचा राजा फारो ह्याचे मन कठीण केले आणि तो इस्राएल लोकांच्या पाठीस लागला; इस्राएल लोक तर मोठ्या धैर्याने चालले होते.


हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?


तेव्हा फारो म्हणाला, “हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही, आणि इस्राएलास काही जाऊ देणार नाही.”


विटा करण्यासाठी तुम्ही ह्या लोकांना आजवर गवत देत आलात तसे ह्यापुढे देऊ नका; त्यांनी स्वत: जाऊन गवत मिळवावे.


आता मी नबुखद्नेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो, त्याचा जयजयकार करतो व त्याचा महिमा वर्णन करतो; कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत; जे अभिमानाने चालतात त्यांना त्याला नीचावस्थेत लोटता येते.


त्या वेळी मिसरी लोक परमेश्वराने ठार केलेल्या आपल्या ज्येष्ठ पुत्रांना मूठमाती देत होते; त्यांच्या देवांनाही परमेश्वराने शासन केले होते.


त्याने आपल्या ‘बाहूने’ पराक्रम केला आहे; जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने ‘गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे.’


तो अधिक ‘कृपा करतो;’ म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी3 नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो; कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे; तो सर्व कृती तोलून पाहतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan