Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 18:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 देवाने मोशे व आपली प्रजा इस्राएल ह्यांच्यासाठी काय काय केले, परमेश्वराने इस्राएलास मिसर देशातून कसे बाहेर आणले हे मोशेचा सासरा मिद्यानाचा याजक इथ्रो ह्याने ऐकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 देवाने मोशे व इस्राएल लोक यांच्यासाठी जे केले तसेच त्यांना परमेश्वराने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी मोशेचा सासरा मिद्यांनी याजक इथ्रो याने ऐकले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आता परमेश्वराने मोशे व त्यांच्या इस्राएली लोकांसाठी काय केले आणि याहवेहने इस्राएली लोकांना कशाप्रकारे इजिप्तमधून बाहेर आणले, याविषयी सर्वकाही मिद्यानी याजक व मोशेचा सासरा इथ्रो याने ऐकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 18:1
33 Iomraidhean Croise  

त्याने आपल्या लोकांना आनंद करत, आपल्या निवडलेल्या लोकांना जयोत्सव करत बाहेर आणले.


त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार, व त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.


परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णू शकेल? त्याची सर्व स्तुती कोण ऐकवील?


माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील; दीन हे ऐकून हर्ष करतील.


हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसांत, पुरातन काळी, तू जे कार्य केलेस त्याचे वर्णन त्यांनी केले, व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले.


त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही; तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू.


तेथील मिद्यानी याजकाला सात मुली होत्या; त्या येऊन पाणी काढून आपल्या बापाच्या शेरडामेंढरांना पाजण्याकरता ते डोणीत भरत होत्या.


त्या आपला बाप रगुवेल ह्याच्याकडे आल्या तेव्हा तो म्हणाला, “आज तुम्ही लवकर कशा आलात?”


आणि मोशे त्या मनुष्याजवळ राहण्यास कबूल झाला; त्याने मोशेला आपली मुलगी सिप्पोरा दिली.


मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो ह्याची शेरडेमेंढरे चारत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला.


मग मोशे तेथून निघून आपला सासरा इथ्रो ह्याच्याकडे गेला व त्याला म्हणाला, “मला मिसरातल्या माझ्या भाऊबंदांकडे परत जाऊ द्या आणि ते अजून जिवंत आहेत किंवा नाहीत ते मला पाहू द्या.” तेव्हा इथ्रो मोशेला म्हणाला, “सुखाने जा.”


म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;


आणि ह्या नगराचे नाव पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांसमोर माझ्या आनंदास, स्तुतीस व सन्मानास कारण होईल; त्यांचे मी जे कल्याण करीन त्याविषयी ती ऐकतील; आणि मी त्यांना हित व शांती प्राप्त करून देईन; ह्या सर्वांमुळे ती राष्ट्रे भयभीत होतील व थरथर कापतील.


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, त्या दिवसांत सर्व भाषा बोलणार्‍या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, ‘आम्ही तुमच्याबरोबर येतो, कारण देव तुमच्याबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”’


मोशेने आपला सासरा मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याला म्हटले, “परमेश्वराने आम्हांला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत, तर तू आमच्याबरोबर चल म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू; ‘कारण इस्राएलाचे कल्याण करीन’ असे परमेश्वर बोलला आहे.”


तेथे पोहचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले.


तेव्हा सर्व लोक गप्प राहिले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे व अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.


ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या सामर्थ्याने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो; ते हे की, यरुशलेमेपासून सभोवती इल्लूरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे.


कारण तुम्ही मिसर देशाहून निघालात तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटवले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोर्‍यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे.


त्यांनी त्याला म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत; त्याची कीर्ती व त्याने मिसर देशात जे जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे;


मोशेचा सासरा2 केनी ह्याचे वंशज यहूदाच्या वंशजांसहित खजुरीच्या नगराहून यहूदाच्या रानात गेले; हे रान अरादाजवळील नेगेबात आहे; तेथे जाऊन ते त्या लोकांबरोबर राहिले.


मोशेचा सासरा1 होबाब ह्याचे वंशज जे केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा विभक्त होऊन केदेशाजवळचे साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली डेरा देऊन राहिला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan