Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 17:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मोशेचे हात भरून आले; तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला, आणि अहरोन आणि हूर ह्यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात वर उचलून धरले म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 काही वेळाने मोशेचे हात थकून गेले. तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशाच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि नंतर एका बाजूने अहरोन व दुसऱ्या बाजूने हूर यांनी आधार देऊन मोशेचे हात सूर्य मावळेपर्यंत तसेच वर स्थिर धरून ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जेव्हा मोशेचे हात थकून गेले, त्यांनी एक दगड घेतला व मोशे त्यावर बसला. अहरोन एका बाजूने व हूर दुसर्‍या बाजूने असे त्यांनी त्याचे हात वर धरून ठेवले; व सूर्यास्तापर्यंत त्याचे हात स्थिर राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 17:12
15 Iomraidhean Croise  

भाला हाती घे, माझा पाठलाग करणार्‍यांचा मार्ग अडव; “मीच तुझे तारण आहे” असे तू माझ्या जिवाला सांग.


त्या वेळी असे झाले की, मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्राएलाची सरशी होई व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई.


मग यहोशवाने आपल्या तलवारीच्या धारेने4 अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला.


मोशे वडिलांना म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच आमची वाट पाहत राहा; पाहा, अहरोन व हूर हे तुमच्याबरोबर आहेत; कोणाचे काही प्रकरण असले तर ते त्याने त्यांच्याकडे न्यावे.”


गलित हस्त दृढ करा; लटपटणारे गुडघे बळकट करा.


तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हांला साहाय्य करावे; असे की जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगे आम्हांला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकारस्तुती करावी.


सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा.


कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही, जगण्याने किंवा मरण्याने, माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे, ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे.


प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुती करत जागृत राहा;


बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.


म्हणून ‘लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा,’


पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वार्‍याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे.


आय येथील सर्व रहिवाशांचा समूळ नाश होईपर्यंत यहोशवाने नगराकडे बरची उगारलेला आपला हात मागे घेतला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan