Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 16:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हांला संध्याकाळी मांस खायला देईल व सकाळी पोटभर भाकर देईल तेव्हा असे होईल; कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध जी कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे; आम्ही कोण? तुमचे कुरकुरणे आमच्याविरुद्ध नाही तर परमेश्वराविरुद्ध आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आणि मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हास संध्याकाळी मांस खावयास देईल; आणि सकाळी पोटभर भाकरी देईल; कारण तुम्ही परमेश्वराविरूद्ध कुरकुर करीत आहा ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण आहो? तुमचे कुरकुरणे आमच्याविरुध्द नाही तर परमेश्वराविरुध्द आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मोशे म्हणाला, “संध्याकाळी जेव्हा याहवेह तुम्हाला मांस आणि सकाळी जी भाकर तुम्हाला पाहिजे ती खायला देतील, कारण त्यांनी त्यांच्याविरुद्ध केलेली तुमची कुरकुर ऐकली आहे. आम्ही कोण आहोत? तुम्ही आमच्याविरुद्ध नाही, तर याहवेहच्या विरुद्ध कुरकुर करीत आहात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 16:8
17 Iomraidhean Croise  

“इस्राएल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे; त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकर खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.”


मोशे अहरोनाला म्हणाला, “इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला सांग की, तुम्ही परमेश्वरासमोर या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे.”


म्हणून ते मोशेशी भांडू लागले व म्हणाले, “आम्हांला प्यायला पाणी दे.” तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी का भांडता? परमेश्वराची परीक्षा का पाहता?”


भ्रष्टाचार करावा, परमेश्वराविरुद्ध पाखंड सांगावे, भुकेला जीव भुकेला ठेवावा, तान्हेल्यास प्यायला काही मिळू देऊ नये म्हणून मूर्ख मूर्खतेचे भाषण करतो, त्याचे मन अधर्म करते.


माझ्यावरल्या तुझ्या संतापामुळे व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे मी तुझ्या नाकात माझी वेसण व तुझ्या तोंडात माझा लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन.’


तू लोकांना सांग की, ‘उद्यासाठी तुम्ही स्वतःला शुद्ध करून घ्या म्हणजे तुम्हांला मांस खायला मिळेल.’ ‘आम्हांला खायला मांस कोण देईल आणि मिसर देशात आम्ही आपले बरे होतो,’ हे तुमचे रडगाणे परमेश्वराच्या कानी गेले आहे, म्हणून परमेश्वर तुम्हांला मांस देणार आहे आणि तुम्ही ते खाल.


“ही दुष्ट मंडळी कोठवर माझ्याविरुद्ध कुरकुर करीत राहणार? हे जे इस्राएल लोक माझ्याविरुद्ध कुरकुर करीत आहेत त्यांची कुरकुर माझ्या कानावर आली आहे;


हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, “परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे; तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.


जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.


येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता?


जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो; जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो; आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो.”


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.”


म्हणून जो अधिकाराला आड येतो, तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणारे आपणांवर दंड ओढवून घेतील.


त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका.


म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.


तेव्हा परमेश्वर शमुवेलाला म्हणाला, “लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक; कारण त्यात ते तुझा धिक्कार करत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करत आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan