Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 16:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, “पाहा, मी आकाशातून तुमच्यासाठी अन्नवृष्टी करीन; आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे, ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुम्हास खाण्याकरता मी आकाशातून अन्नवृष्टी करीन; प्रत्येक दिवशी या लोकांनी आपल्याला त्या दिवसास पुरेल एवढे अन्न बाहेर जाऊन गोळा करावे. यावरुन ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांची परीक्षा पाहीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मग याहवेहने मोशेला म्हटले, “मी तुमच्यासाठी स्वर्गातून भाकरीची वृष्टी करेन. लोकांनी दररोज बाहेर जाऊन त्या दिवसासाठी पुरेलसे गोळा करावे. म्हणजे ते माझ्या सूचनेप्रमाणे वागतात की नाहीत याची मला परीक्षा करता येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 16:4
17 Iomraidhean Croise  

कारण त्यांच्यासंबंधाने राजाची आज्ञा होती व रोजच्या जरुरीप्रमाणे गाणार्‍यांची व्यवस्था ठरली होती.


आणि त्यांची क्षुधा भागवण्यासाठी तू आकाशातून त्यांना अन्न दिले, त्यांची तृषा शमवण्यासाठी खडकातून पाणी काढले आणि त्यांना अशी आज्ञा केली की जो देश तुम्हांला देण्यासाठी मी बाहू उभारून आणभाक केली आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तुम्ही त्यात जा.


त्याप्रमाणे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून तू त्यांना आपला सदात्मा दिलास; त्यांच्या तोंडचा मान्ना तू काढून घेतला नाहीस; आणि त्यांची तृषा शांत करण्यासाठी तू त्यांना पाणी देत राहिलास.


त्यांनी अन्न मागितले तेव्हा त्याने लावे पक्षी आणले, आणि स्वर्गीय अन्नाने त्यांना तृप्त केले.


तरी त्याने वरती आभाळांस आज्ञा केली, व आकाशद्वारे उघडली.


त्याने परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखवले, ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने2 त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला; त्यांना कसोटीस लावले आणि म्हटले,


इस्राएल लोक ते पाहून एकमेकांना म्हणाले, “हे काय?”1 कारण ते काय होते ते त्यांना माहीत नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, “परमेश्वराने तुम्हांला खायला दिले आहे ते हेच.


व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख; दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस; मला आवश्यक तेवढे अन्न खायला दे.


आमची रोजची भाकर आज आम्हांला दे;


आमची रोजची भाकर रोज आम्हांला दे;


त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले;


तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले.


तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली चाळीस वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण कर.


परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोर्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan